शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

दोन एकर शेतात मिश्र पिके घेऊन लाखोंचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:35 IST

पारंपरिक पिकांना फाटा : फळे, फुले, भाजीपाल्यांची लागवड वरोरा : पारंपारिक पिकाला फाटा देत वरोरा शहरानजीकच्या चिनोरा गावातील एका ...

पारंपरिक पिकांना फाटा : फळे, फुले, भाजीपाल्यांची लागवड

वरोरा : पारंपारिक पिकाला फाटा देत वरोरा शहरानजीकच्या चिनोरा गावातील एका शेतकऱ्याने दोन एकर शेतात मागील काही वर्षांपासून मिश्र पिके घेणे सुरू केले. या दोन एकर शेतात त्या शेतकऱ्याला वर्षाकाठी लाखो रुपयांचा नफा मिळत आहे.

वरोरा शहरालगतच्या चिनोरा गावातील पांडुरंग डोंगरकर यांची औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत दोन एकर शेती आहे. पूर्वी ते शेतात सोयाबीन व कपाशीचे पीक घेत होते. कधी सोयाबीन, तर कधी कपाशीने धोका दिल्याने अनेकदा लागवडीचा खर्चही निघत नव्हता. त्यामुळे त्यांनी कृषी विभागाच्या स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत फळझाडांची लागवड केली. सध्या पेरूला वर्षभरात दोनदा फळधारणा होत असल्याने पेरूचे उत्पादन चांगल्या प्रकारे होत आहे. यासोबत दहा प्रकारची फळझाडे लावली. त्यात बोर, चिकू, सीताफळ, डाळींब, आवळा, आदी फळांचा समावेश आहे. उर्वरित जागेत नर्सरी असून, इतर जागेत ते बारमाही भाजीपाल्याचे उत्पादन घेत असतात. जनावरांकरिता हिरवा चारा, कुक्कुट पालन, शेळीपालन त्यांनी केले आहे.

मागील काही वर्षांपासून शेतात मिश्र पिकाचा प्रयोग केल्याने त्याचा मोठा फायदा झाल्याचे शेतकरी पांडुरंग डोंगरकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी विजय काळे उपस्थित होते.

बॉक्स

शेतात सफरचंदाची झाडे

पांडुरंग डोंगरकार यांनी याच शेतात प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षापूर्वी दोन सफरचंदाची झाडे लावली. आपल्याकडील ४७ अंश तापमानात ती झाडे टिकली असून, दीड वर्षानंतर त्याला फळे येतील. हिमाचल प्रदेशातील सफरचंद निघण्याच्या दोन महिन्यांपूर्वी या झाडाचे सफरचंद पूर्ण विकसित होईल. त्यामुळे दर चांगला मिळणार आहे. ही दोन झाडे टिकली म्हणून त्यांनी वाशिम परिसरातून ५० सफरचंदाची झाडे मागविली आहेत.

बॉक्स

शेतातील एक इंचही जागा सोडली नाही

शेतातील विहिरीमधील पाणी ठिबक सिंचन पद्धतीने पिकांना देत असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत असते. भाजीपाला व फळे वरोरा शहर परिसरातील गावात किरकोळ पद्धतीने विकत असल्याने त्यांना चांगला नफा मिळत आहे. त्यात दोन एकर शेतात फुलांचे उत्पादनही घेतले जाते. व्यापारी शेतात येऊन फुले विकत घेऊन जातात. दोन एकर शेतातील एकही इंच जागा ते सोडत नाहीत. प्रत्येक जागेवर उत्पादन घेत आहेत, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.