जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 06:00 AM2019-11-22T06:00:00+5:302019-11-22T06:00:43+5:30

देशातील चेन्नई या शहराची लोकसंख्या दहा मिलियन एवढी आहे. दरवर्षी याठिकाणी पाऊस होतो. परंतु त्याचे नियोजन नसल्यामुळे ते पाणी वाहून जाते. यासोबतच भारताची आर्थिक राजधानी मुंबई या शहरालासुद्धा पाणीटंचाईने ग्रासले आहे. आयटी क्षेत्रातील अग्रगण्य हैदराबाद आणि बेंगलोर ही शहरेसुद्धा आज पाणीटंचाईने संकटात सापडलेली आहेत.

Immediately complete the irrigation project in the district | जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करा

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करा

Next
ठळक मुद्देबाळू धानोरकर : लोकसभेचे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारतात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होते. तरीसुद्धा देशातील मोठी शहरे आज तहानलेलीच आहे. त्यामुळे शासन रखडलेले सिंचन प्रकल्प केव्हा पूर्ण करणार, असा प्रश्न चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी लोकसभेचे प्रश्नोत्तराच्या तासात मांडला.
देशातील चेन्नई या शहराची लोकसंख्या दहा मिलियन एवढी आहे. दरवर्षी याठिकाणी पाऊस होतो. परंतु त्याचे नियोजन नसल्यामुळे ते पाणी वाहून जाते. यासोबतच भारताची आर्थिक राजधानी मुंबई या शहरालासुद्धा पाणीटंचाईने ग्रासले आहे.
आयटी क्षेत्रातील अग्रगण्य हैदराबाद आणि बेंगलोर ही शहरेसुद्धा आज पाणीटंचाईने संकटात सापडलेली आहेत. कृषिप्रधान भारताची अर्थव्यवस्था मान्सूनच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे या पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. आज या मोठया शहारांसह ग्रामीण भाग सिंचनाच्या अभावामुळे पाण्याच्या समस्येला तोंड देत आहे.
शेतकऱ्यांच्या पिकांवर त्याचा विपरित परिणाम झाला असून शेतकऱ्यांच्या आत्महत्यासुद्धा वाढल्या असल्याचे खासदार बाळू धानोरकर म्हणाले.
चंद्रपूर जिल्ह्यात लोअर पैनगंगा, गोसेखुर्द यासारखे मोठे जलसिंचन प्रकल्प आहेत.
मात्र राज्यातील सरकारच्या नियोजनशून्यते मुळे हे प्रकल्प अपूर्ण आहेत. ते केव्हा पूर्ण होणार याची माहिती शासनाने सभागृहाला द्यावी, असे खासदार बाळू धानोरकर म्हणाले. याशिवाय समुद्राचे पाणी शुद्ध करून त्याचा वापर शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी करण्याची काही योजना शासनाची आहे काय, याबद्दलही खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विचारले. शासनाने नद्यांवर बंधारे बांधण्याची योजना असल्यास जलसिंचनाची समस्या सुटू शकेल आणि दुष्काळावर मात करता येईल, असे ते म्हणाले. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे ख्नासदार बाळू धानोरकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

Web Title: Immediately complete the irrigation project in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.