शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या वऱ्हाड्यांची ट्रकद्वारे अवैध वाहतूक

By admin | Updated: May 18, 2015 01:24 IST

लग्न सराईची धूम असल्याने ट्रकद्वारे वऱ्हाड्यांची अवैध वाहतूक होताना दिसत आहे.

मूल : लग्न सराईची धूम असल्याने ट्रकद्वारे वऱ्हाड्यांची अवैध वाहतूक होताना दिसत आहे. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत असल्याने चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघाताचे प्रमाण वाढल्याचे चित्र बघायला मिळत आहे.मूल शहराबरोबरच तालुक्यातदेखील ट्रकद्वारे अशी अवैध वाहतूक जोमात सुरू असल्याचे दिसून आहे. मात्र यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. ज्यांच्यावर वाहतुकीची जबाबदारी सोपवली आहे. त्या वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या गंभीर बाबीकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी होऊ लागली आहे.उन्हाळा म्हटला की उन्हाची दाहकता व त्याचबरोबर लग्नाची धूम बघायला मिळत असते. विशेषत: मे महिन्यात उन्हाची दाहकता मोठ्या प्रमाणात असल्याने अंगाची लाहीलाही होत असते. त्यातच लग्न म्हटले की, जीवाचा आटापिटा सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत नवरदेवाचे वऱ्हाड वधुमंडपी नेताना ट्रकमध्ये वऱ्हाड्यांना अक्षरश: कोंबून बसविले जाते. वाहनचालकाला थोडेफार पैशाचे आमिष दाखविले की क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना वाहनात बसविले जाते. अशावेळी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे आधीच ओव्हरलोड वाहन असते. त्यातही ते भरधाव वेगाने चालविल्याने अनेकदा अपघात घडले आहेत. वाहतूक शिपायाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र वाहतूक शिपाई त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अपघात घडतो. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाडीत कोंबल्यास चालकाचे नियंत्रण कसे काय राहाणार? यासाठी ट्रकद्वारे लग्नाच्या वराती नेण्यास बंधने घातली पाहिजे आणि ट्रकची क्षमता लक्षात घेऊनच त्याच प्रमाणात प्रवासी नेण्यास पोलिसांनी बाध्य केले पाहिजे. यासाठी पोलीस प्रशासनाने गंभीर असणे आवश्यक आहे. अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)