अवैध रेती वाहतुकीचे ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 06:00 AM2019-09-19T06:00:00+5:302019-09-19T06:00:39+5:30

ट्रॅक्टरच्या (क्रमांक एमएच ३४ एफ ९३०५) ट्रॅक्टरमालक महेश नारायण रामटेके रा. भिसी हा रेती वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती मिळताच वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मोकास्थळी जाऊन ट्रॅक्टरला रेतीसह जप्त केले. त्यानंतर सदर ट्रॅक्टर चिमूर येथील तहसील कार्यालयात तहसीलदार संजय नागटिळक यांच्या सुपुर्द करण्यात आले.

Illegal sand transport tractor seized | अवैध रेती वाहतुकीचे ट्रॅक्टर पकडले

अवैध रेती वाहतुकीचे ट्रॅक्टर पकडले

Next
ठळक मुद्देवनविकास महामंडळाच्या पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
खडसंगी : वनविकास महामंडळाच्या पथकाने खडसंगी वनपरिक्षेत्रातील भिसी गावालगत वन विकास महामंडळाच्या राखीव वन क्षेत्रातील कक्ष क्रमांक १७ मधील क्षेत्रातून अवैधरित्या रेती नेत असताना एका ट्रॅक्टरला पकडले. ही कारवाई वनविकास महामंडळाच्या पथकाने केली.
ट्रॅक्टरच्या (क्रमांक एमएच ३४ एफ ९३०५) ट्रॅक्टरमालक महेश नारायण रामटेके रा. भिसी हा रेती वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती मिळताच वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मोकास्थळी जाऊन ट्रॅक्टरला रेतीसह जप्त केले. त्यानंतर सदर ट्रॅक्टर चिमूर येथील तहसील कार्यालयात तहसीलदार संजय नागटिळक यांच्या सुपुर्द करण्यात आले. संबंधितावर पुढील कारवाई तहसीलदार नागटिळक व वनाधिकारी हे करीत आहेत. चिमूर क्षेत्रात वन विकास महामंडळाच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे अवैधरित्या रेती वाहतूक करणाºया रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई वनविकास महामंडळाचे विभागीय वनाधिकारी मोरे, सहायक व्यवस्थापक सुनील आत्राम, यांच्या मार्गदर्शनाखाली खडसंगी वन परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहिणी गाडेकर तसेच वन परिमंडळ अधिकारी रमेश बलैया, क्षेत्र सहायक ए.जी. बायस्कर, वनरक्षक आर.पी.अगोसे, के.बी. चव्हाण, वनमजूर गोटे, पातूरकर व इतर अधिकाऱ्यांनी केली.

Web Title: Illegal sand transport tractor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू