रामपूर टी पॉईंटवर ट्रकांची अवैध पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:19 IST2021-07-16T04:19:56+5:302021-07-16T04:19:56+5:30

फोटो सास्ती : राजुरा शहरालगत असलेल्या राजुरा - सास्ती - गोवरी - गडचांदुर टी पॉईंट हा जोड रस्ता आहे. ...

Illegal parking of trucks at Rampur T point | रामपूर टी पॉईंटवर ट्रकांची अवैध पार्किंग

रामपूर टी पॉईंटवर ट्रकांची अवैध पार्किंग

फोटो

सास्ती : राजुरा शहरालगत असलेल्या राजुरा - सास्ती - गोवरी - गडचांदुर टी पॉईंट हा जोड रस्ता आहे. या ठिकाणी रस्त्यावर दोन्ही बाजुला वाहने उभी केलेली असतात. यामुळे वळण रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना समोरील वाहन दिसत नसल्याने अनेकदा अपघात झालेले आहेत. या ठिकाणावरून अनेकदा पोलीस प्रशासनाचे वाहन फिरत असते. मात्र, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

रामपूर टी पॉईंटवरून सास्ती - बल्लारपूर, गोवरी - कवठाळा, राजुरा - गडचांदूरकडे जाणारे मार्ग आहेत. यामुळे या पॉईंटवर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. मात्र, याच टी पॉईंटवर वेकोलीतून कोळसा वाहतूक करणारे ट्रक रस्त्यावर दोन्ही बाजूंनी उभे करून वाहन चालक आपल्या घरी जात असतात. यामुळे या ठिकाणावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत असून, अनेकदा छोट्या मोठ्या अपघातांच्या घटना घडल्या आहेत.

या व‌ळण रस्त्यालगत घर असून, येथील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ट्रक चालकांची एवढी मुजोरी वाढली की, ते नागरिकांच्या घरासमोर वाहन उभे करून ठेवत आहेत. दररोज पोलीस प्रशासनाची वाहने या ठिकाणी येत असतात. मात्र, या अवैध ट्रक पार्किंग करणाऱ्या वाहनांवर पोलीस कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्न निर्माण होत आहे. याकडे पोलीस निरीक्षकांनी लक्ष देऊन अवैध पार्किंग वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Illegal parking of trucks at Rampur T point