शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

शेणगाव आरोग्य केंद्राच्या इमारतीत अवैध खत साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 5:00 AM

धान्य पेरणीचा हंगाम जवळ येत आहे. एकीकडे शासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर रासायनिक खताचा पुरवठा करीत आहेत तर दुसरीकडे साठेबाजीकरिता शेणगाव येथील शिव कृषी केंद्राचे १३०० बॅग रासायनिक खत चक्क आरोग्य केंद्राच्या नवनिर्मिती इमारतीत साठविले होते. गुप्त माहिती मिळताच जिवतीच्या तहसीलदारांनी धडक कारवाई करीत खतसाठा ताब्यात घेतला आहे.

ठळक मुद्देतहसीलदाराची कारवाई : काळाबाजारीकरिता चक्क शासकीय इमारतीचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कपाटण/जिवती : अतिदुर्गम म्हणून ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील शेणगाव येथे खताचा अवैध साठा आढळला. कृषी केंद्र चालकाने काळाबाजारीकरिता चक्क शासकीय इमारतीचा वापर केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी उघडकीस आली.धान्य पेरणीचा हंगाम जवळ येत आहे. एकीकडे शासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर रासायनिक खताचा पुरवठा करीत आहेत तर दुसरीकडे साठेबाजीकरिता शेणगाव येथील शिव कृषी केंद्राचे १३०० बॅग रासायनिक खत चक्क आरोग्य केंद्राच्या नवनिर्मिती इमारतीत साठविले होते. गुप्त माहिती मिळताच जिवतीच्या तहसीलदारांनी धडक कारवाई करीत खतसाठा ताब्यात घेतला आहे. काळाबाजारीकरिता थेट शासकीय इमारतीचा आधार घेतल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता व कंत्राटदार एजन्सी यांची नेमकी भूमिका न समजणारी आहे. खतांची कमतरता दाखवून भाववाढीसाठी अवैध साठेबाजी तर करण्यात आली नाही ना, अशी शंका परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.तहसीलदारांच्या कारवाईने कृषी केंद्रचालकांचे धाबे दणाणले आहे. चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये रासायनिक खत कोणी ठेवले, मला याबाबत कुठलीही माहिती नाही. पत्रकारांनी फोन केल्यावर प्रकरण लक्षात आले. साईट इन्चार्जकडून माहिती घेऊन सदर रासायनिक खताचा साठा तात्काळ हटविण्यास सांगणार आहे.-मेसर्स तिरूपती कन्स्ट्रक्शनलॉकडाऊनमुळे शेणगाव आरोग्य केंद्राचे बांधकाम बंद आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून बांधकामास भेट दिली नाही. शासकीय इमारतीत अवैध रासायनिक खत साठविणे चुकीचे आहे. कंत्राटदार एजन्सीने कोणाच्या परवानगीने इमारत दिली, हे बघावे लागेल. मी रविवारी शेणगाव येथे जाऊन चौकशी करून कारवाई करणार आहे.- राजकुमार गेडाम,शाखा अभियंता, जिवतीशेणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरू असताना सिमेंट बॅग ठेवण्याकरिता मी माझ्या मालकीचे गोदाम कंत्राटदाराच्या विनंतीवरून दिले होते. सध्या माझा कापूस निघाला नसल्याने गोदामात जागा नाही. त्यामुळे खत ठेवण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची कंत्राटदाराला परवानगी मागितली आणि त्यांनी परवानगी दिली. त्यामुळे मी त्या ठिकाणी खत ठेवले.- पृथ्वीराज खंडाळे, कृषी केंद्र चालकशेणगाव आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये अवैध रासायनिक खत साठविल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पंचनामा करून खतसाठा सील केला आहे. या संबंधाने शिव कृषी केंद्र चालकाला नोटीस बजाविली असून चौकशी करून यात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई होणार आहे. शासकीय इमारतीत खतसाठा करणे बेकायदेशीर आहे.-प्रशांत बेडसे पाटील, तहसीलदार, जिवती

टॅग्स :Tahasildarतहसीलदार