शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

पुतळा स्वच्छतेसाठी पैसे नसेल तर आम्ही देऊ

By admin | Updated: January 14, 2016 01:28 IST

ज्या मा.सा. कमन्नमवार यांनी चंद्रपूरचे नाव महाराष्ट्रात मोठे केले, त्या नेत्याच्या पुतळ्याची अवहेलना बरी नव्हे.

अवहेलना टाळा : शांताराम पोटदुखे यांचे आवाहनचंद्रपूर : ज्या मा.सा. कमन्नमवार यांनी चंद्रपूरचे नाव महाराष्ट्रात मोठे केले, त्या नेत्याच्या पुतळ्याची अवहेलना बरी नव्हे. पुतळा स्वच्छ करण्यासाठी महानगर पालिकेकडे पैसा नसेल तर आम्ही देऊ, पण ही अवहेलना थांबवा, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांनी केले आहे.शांताराम पोटदुखे हे अध्यक्ष असलेल्या लोकसेवा आणि विकास संस्थेच्या वतीने १६ जानेवारीला पुरस्कार दिले जात आहेत. यात कर्मवीर कन्नमवार पुरस्काराचाही समावेश आहे. एकीकडे कन्नमवार यांच्या नावाने पुरस्कार दिले जात असताना त्याच शहरातील कन्नमवारांचा पुतळा मात्र कचऱ्यात उभा असणे, हा विरोधाभास आहे. ‘लोकमत’मध्ये मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या वृत्ताची दखल घेऊन शांताराम पोटदुखे यांनी आपली संवेदना आणि कळकळ व्यक्त केली. ते म्हणाले, हा पुतळा कुणी उभारला आणि कुणी स्वच्छ करावा हा वाद निरर्थक आहे. पुतळा जिल्हा परिषदेने उभारला असला तरी शहरातील पुतळ्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी महानगर पालिकेची असते. या पुतळ्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया झाली अथवा नाही हे आपणास माहीत नाही, मात्र मनपा आपली जबाबदारी टाळू शकत नाही. त्यांच्याकडे पुतळा स्वच्छ करण्यासाठी माणसे आणि पैसा नसेल तर त्यांनी सांगावे, त्यासाठी आम्ही पैसा देऊ, असेही ते म्हणाले.