शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी उमेदवारांची शोधाशोध

By admin | Updated: June 10, 2014 23:58 IST

पोंभुर्णा तालुक्यातील जामतुकूम जामखुर्द ग्रामपंंचायतीची सार्वत्रिक निवडणूक येत्या २२ जून रोजी होत असल्याने गावात राजकीय कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण

देवाडा (खुर्द) : पोंभुर्णा तालुक्यातील जामतुकूम जामखुर्द ग्रामपंंचायतीची सार्वत्रिक निवडणूक येत्या २२ जून रोजी होत असल्याने गावात राजकीय कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. जामतुकूम व जामखुर्द या दोन्ही सात सदस्यीय ग्रामपंचायती असून महिलांच्या ५० टक्के आरक्षणामुळे राजकीय पक्षाची झोप उडाली आहे. महिलांच्या आरक्षणामुळे पुरुषांना आपली उमेदवारी सोडावी लागत असल्याचे शल्य मनात असले तरी कायद्याच्या चौकटीत बांधलेला पुरुष मात्र पक्षाच्या हितासाठी अधिक परिश्रम घेण्याच्या तयारीत दिसून येत आहे. २२ जून रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या गटाचा उमेदवार शोधणे सुरू केले असून त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या पुर्ततेसाठी कागदपत्र जमा करण्यात मग्न झाले आहेत.जामतुकूम येथे सर्वसाधारण महिला सरपंचपदाचे सेक्टर असून जामखुर्द येथे सरपंचपद सामान्य महिलेसाठी राखी आहे. ५० टक्के महिलांना उमेदवारी द्यावयाची आहे. मात्र असे असले तरी गावातील अनेक महिलांकडे जातप्रमाणपत्र, शौचालय सुविधा, गृहकाराची पावती नसल्याने महिला उमेदवार शोधणे राजकीय कार्यकर्त्यांना मोठे कठिण चालले आहे. ज्या महिलांजवळ ही कागदपत्रे आहेत, त्यांनी निवडणुकीत उभे रहावे, यासाठी त्यांची मनधरणी केली जात आहे. काही महिला राजकीय क्षेत्रात काम करण्यास इच्छुक दिसून येत नसल्याने उमेदवार शोधण्यास बरीच कसरत करावी लागणार आहेत. त्यामुळे महिला आरक्षणातील जागा कशा भरू काढाव्या, हा प्रश्न सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांपुढे आ वासून उभा आहे. एवढेच नाही तर बऱ्याच पक्षाचे कार्यकर्ते उमेदवारांचा संपूर्ण खर्च उचलण्यासाठी तयार झालेले आहे. त्यासाठी महिला उमेदवारांची शोधमोहिम झपाट्याने सुरू आहे.विशेष म्हणजे यावर्षी महिलांसाठी सरपंचपद राखीव असल्याने सरपंचपदाच्या उमेदवारीकडे जास्त लक्ष घालून महिलांची मनधरणी करणे सुरू आहे. तालुक्यात जामतुकूम, जामखुर्द या गावची निवडणूक होत असल्याने दोन्ही गावात राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे. कार्यकर्ते व पदाधिकारी निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. (वार्ताहर)''