विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांवर उपासमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 05:00 AM2020-09-21T05:00:00+5:302020-09-21T05:00:24+5:30

विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक कनिष्ठ व उच्च महाविद्यालयात विनावेतन काम करणाºया शिक्षकांवर उर्वरित वेळेत उदरनिर्वाहासाठी विविध काम करणे सुरु केले आहे. काही शिक्षक शिकवणी घेऊन आपला उदरनिर्वाह करायचे. मात्र कोरोनामुळे शिकवणीवरही निर्बंध आले आहे. परिणामी आर्थिक अडचणीत त्यांना एक एक दिवस काढावा लागत आहे.

Hunger on teachers working on unsubsidized basis | विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांवर उपासमारी

विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांवर उपासमारी

Next
ठळक मुद्देकोरोनाने बदलविले जगण्याचे तंत्र : बारामती येथील आंदोलनाला शिक्षकांचा पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विना अनुदानित तत्त्वावर काम करणाºया शिक्षकांचे पगाराविना हाल सुरू आहेत. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने त्यांच्यावर ना काम, ना वेतन अशी वेळ आली आहे. त्यामुळे संस्थाचालकांनी तसेच शिक्षकांनी त्यांना आर्थिक मदत करून दिलासा देण्याची गरज आहे.
विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक कनिष्ठ व उच्च महाविद्यालयात विनावेतन काम करणाºया शिक्षकांवर उर्वरित वेळेत उदरनिर्वाहासाठी विविध काम करणे सुरु केले आहे. काही शिक्षक शिकवणी घेऊन आपला उदरनिर्वाह करायचे. मात्र कोरोनामुळे शिकवणीवरही निर्बंध आले आहे. परिणामी आर्थिक अडचणीत त्यांना एक एक दिवस काढावा लागत आहे. विविध संघटनांच्या संघर्षाने २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कायम हा शब्द वगळला व मूल्यांकनाच्या माध्यमातून अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र त्यानंतर अनुदान मिळाले नाही. तसेच १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार २० टक्के अनुदान दिले. मात्र ते अनुदान निधीमुळे प्रतिक्षेतच आहे. घरी राहून सुरक्षित राहा, असा संदेश दिल्या जात आहे. मात्र उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्यामुळे शिक्षकांचे बेहाल सुरु आहे. मागील अनेक वर्षांपासून आज ना उद्या नियमीत वेतन सुरु होईल, या आशेवर शिक्षक कर्तव्य बजावत आहेत. मात्र शासनाकडून त्यांना केवळ आवश्वासनच देण्यात येत आहे. त्यामुळे विविध आंदोलन करून शासनानेचे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र अद्यापही कोणताही फायदा झाला नाही.

इंग्रजी शाळेतील शिक्षकही हैराण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही शाळा, महाविद्यालय सुरु झाले नाही. इंग्रजी शाळांतील शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या फी मधून वेतन दिले जाते. मात्र शाळा सुरु नसल्याने पालक फी भरण्याच्या मानसिकतेच नाही. त्यामुळे इंग्रजी शाळांतील शिक्षकांचेही वेतन अडले आहे.विशेष म्हणजे, काही मोठ्या शाळांतील शिक्षकांना अर्धेच वेतन दिल्या जात आहे. मात्र आर्थिक स्थिती कमजोर असलेल्या शाळांतील शिक्षकांना वेतनच दिल्या जात नसल्यामुळे या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, चंद्रपूर शहरातील काही शाळांनी पालकांकडे फी भरण्यासाठी एसएमएस पाठविणे सुरु केले आहे. त्यामुळे काही पालक फी भरत आहेत. तर काहींनी शाळा सुरु झाल्याशिवाय फी भरणार नसल्याचेही संस्थाचालकांना सुनावले आहे. यावर तोडगा म्हणून काही शाळांनी फी मधील रकमेमध्ये काही टक्क्यांची सुटसुद्धा दिली आहे. असे असले तरीही पालक फी भरण्याच्या मानसिकतेत नाही.

Web Title: Hunger on teachers working on unsubsidized basis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.