शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

आमदार जोरगेवारांकडून मुख्यमंत्र्यांचे तोंड गोड; तिळगूळ देत म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 13:05 IST

दावोस परिषदेत महाराष्ट्राची भरारी

चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोस येथे दौऱ्यावर गेले होते. दरम्यान, स्वित्झर्लंड येथील दावोस येथे आयोजित 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये विविध उद्योजकांसमवेत चंद्रपूरसाठी २० हजार ६००  कोटी रुपयांचे दोन मोठे प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार केला. बेरोजगार युवकांसाठी रोजगारनिर्मिती आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले. यानिमित्त चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन गुंतवणूकीबाबाबत शुभेच्छा दिल्या व संक्रांतीच्या निमित्ताने तिळगूळ देऊन तोंड गोड केले.

स्वित्झर्लंड येथील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राशी सुमारे ८८ हजार कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. यामध्ये विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठीच जवळपास २२ हजार कोटींची गुंतवणूक आणली आहे. या गुंतवणुकीमुळे विदर्भासह राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मीती होऊन अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे मुंबईत परतल्यानंतर आमदार जोरगेवारांनी त्यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांना तिळगूळ देऊन - गोड गोड बोला, असे म्हणत या उद्योगांसह रिफायनरी प्रकल्पसुद्धा चंद्रपूरला  द्यावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

दावोसमध्ये करार करणाऱ्या तीन कंपन्या महाराष्ट्राच्याच

झालेले करार -

  • पुणे येथे २५० कोटी रुपये खर्चाचा रूखी फूडसचा ग्रीनफिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प. 
  • औरंगाबाद येथे १२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा ग्रीनको नविनीकरण ऊर्जेचा (रिन्युएबल एनर्जी) प्रकल्प, ६,३०० जणांना रोजगार मिळेल.
  • बर्कशायर-हाथवेबरोबर १६ हजार कोटींचा गुंतवणूक करार. नागरी विकासाला चालना मिळेल.
  • पुण्याजवळ जपानच्या निप्रो कार्पोरेशनचा १,६५० कोटी रुपये गुंतवणुकीचा ग्लास ट्यूबिंग प्रकल्प. यामुळे महाराष्ट्रातील औषध निर्मिती क्षेत्राला चालना मिळणार असून, यातून २ हजार रोजगार निर्मिती होईल.
  • मुंबई येथे इंडस् कॅपिटल पार्टनर्स यांचा १६ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा प्रकल्प येणार असून, आरोग्य, तंत्रज्ञान, संरक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट दर्जाच्या सेवा देता येऊ शकतील.
  • बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर मुंबई महानगरात स्मार्ट व्हिलेज उभारणीस करार.
  • अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनचा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे २० हजार कोटींचा कोल गॅसीफिकेशन प्रकल्प 
  • ब्रिटनच्या वरद फेरो ॲलाँईजचा गडचिरोलीतील चार्मोशी येथे १,५२० कोटींचा स्टील प्रकल्प 
  • इस्रायलच्या राजुरी स्टील्स ॲण्ड अलॉईजचा चंद्रपूरमधील मूल येथे ६०० कोटींचा स्टील प्रकल्प
  • पोर्तुगालच्या एलाईट प्लास्ट ॲटो सिस्टीम्सचा पिंपरी येथे ४०० कोटींचा प्लास्टिक ॲटोमोटीव्हज् प्रकल्प तसेच गोगोरो इंजिनिअरिंग व बडवे इंजिनिअरिंगचा २० हजार कोटींचा ऑटो प्रकल्प.
टॅग्स :SocialसामाजिकEknath Shindeएकनाथ शिंदेMLAआमदारchandrapur-acचंद्रपूर