शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी खुद्द तहसीलदार नागरिकांच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 05:00 IST

शनिवारी हिरापूर येथे लसीकरण घेण्यात आले. सुरुवातीला लोकांचा सहभाग अल्प होता. तेवढ्यात सावलीचे तहसीलदार परीक्षित पाटील, नायब तहसीलदार सागर कांबळे, संवर्ग विकास अधिकारी निखिल गावळे, यांनी हिरापूर येथे लसीकरण केंद्राला भेट दिली. भेटीदरम्यान प्रतिसाद अल्प असल्याचे दिसून आल्यानंतर तहसीलदार पाटील यांनी प्रत्यक्ष लोकांच्या घरी जाऊन संपूर्ण हिरापूर गाव पिंजून काढला. 

ठळक मुद्देहिरापूर गाव पिंजून काढला : ग्रामस्थांना समजावून लसीकरणासाठी बाध्य केले

उदय गडकरीलोकमत न्यूज नेटवर्कसावली : सध्या कोविडने सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण दिसून येत आहेत. शासनाने गावागावात लसीकरण मोहिमेला सुरुवात केली आहे. प्रत्यक्षात ग्रामीण भागातील लोक लसीकरणासाठी घाबरत होते. शनिवारी हिरापूर येथे लसीकरण घेण्यात आले. सुरुवातीला लोकांचा सहभाग अल्प होता. तेवढ्यात सावलीचे तहसीलदार परीक्षित पाटील, नायब तहसीलदार सागर कांबळे, संवर्ग विकास अधिकारी निखिल गावळे, यांनी हिरापूर येथे लसीकरण केंद्राला भेट दिली. भेटीदरम्यान प्रतिसाद अल्प असल्याचे दिसून आल्यानंतर तहसीलदार पाटील यांनी प्रत्यक्ष लोकांच्या घरी जाऊन संपूर्ण हिरापूर गाव पिंजून काढला. या दरम्यान त्यांनी कोरोना लस लोक का घेत नाहीत, याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कोरोना लसीचे महत्त्व प्रत्यक्ष लोकांना घरोघरी जाऊन समजावून सांगितले. नागरिकांनी तहसीलदारांच्या आवाहनाला  दाद देत  लस घेण्यास प्रतिसाद दिला. सुमारे ४२ लोकांनी लस घेतली. तहसीलदारांनी मागील आठवड्यात राईस मिल, गुरुबक्शानी कन्स्ट्रक्शन व इतर सामाजिक कार्यकर्त्यांकडून कोविडसाठी मदत मागितली होती.  नागरिकांनीसुध्दा त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. यादरम्यान नायब तहसीलदार सागर कांबळे, संवर्ग विकास अधिकारी निखिल गावळे यांनी लोकांना मार्गदर्शन केले. यावेळी हिरापूरच्या सरपंच प्रीती गोहणे, उपसरपंच शरद कन्नाके, संजय सायंत्रावार, नितीन गोहणे उपस्थित होते.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसTahasildarतहसीलदार