शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या मनमानीने गुलाब झाला बेघर !

By admin | Updated: February 1, 2016 00:54 IST

मेंडकी ग्रामपंचायत अंतर्गत टेकरी रीठ येथील गट नं. ४० व ४३ ही वनविभागाची जागा न्यायालयाच्या आदेशानुसार निवासी उपयोगासाठी सन २००१ पासून कायम करण्यात आली.

ब्रह्मपुरी : मेंडकी ग्रामपंचायत अंतर्गत टेकरी रीठ येथील गट नं. ४० व ४३ ही वनविभागाची जागा न्यायालयाच्या आदेशानुसार निवासी उपयोगासाठी सन २००१ पासून कायम करण्यात आली. आज रविवारी सकाळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही माहिती न देता गुलाब गुरनुले यांची झोपडी पाडून त्यांना बेघर केले. वनविभागाच्या या मनमानी कारभारामुळे गुलाब गुरुनुलेंचा संसार उघड्यावर आला आहे.प्राथमिक गरजामध्ये अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टींचा समावेश आहे. त्या सर्वांना मिळाल्या पाहिजे, यासाठी शासन शर्तीचे प्रयत्न करीत असते तर दुसरीकडे वनविभाग मात्र हे सर्व ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने गरिबांना थंडीच्या दिवसात घराला मुकावे लागले आहे. वनविभागाच्या या कारवाईमुळे लहान मुले, वृद्ध आई व पत्नी यांना घेऊन संसार कुठे थाटायचा, असा प्रश्न गुलाबसमोर निर्माण झाला आहे. टेकरी रीठ येथे वनविभागाची जागा आहे. परंतु जवळजवळ २०० झोपड्या वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने वेळोवेळी त्यांना अतिक्रमण काढण्याविषयी यापूर्वी सूचित केले होते. संपूर्ण झोपडपट्टीधारकांनी या जागेविषयी न्यायालयात धाव घेतली व २००१ ला न्यायालयाने एकूण गट नंबर पैकी ४० व ४३ गटनंबरची जागा निवासी उपयोगासाठी कायम केली. असे असतानाही वनविभागाने आज सकाळी कोणतीही पूर्वसूचना न देता झोपड्या पाडायला सुरुवात केली. दरम्यान माजी सरपंच व काँग्रेस तालुका सचिव थानेश्वर कायरकर हे घटनास्थळी पोहचले व इतर झोपड्या पाडण्यासाठी मज्जाव केला. तेव्हा कारवाई थांबविण्यात आली. परंतु गुलाब गुरनुले यांची झोपडी पाडल्याने त्याचा संसार उघड्यावर आला आहे. (तालुका प्रतिनिधी)