शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणामुळे नष्ट होतेय ऐतिहासिक वैभव

By admin | Updated: February 15, 2016 01:10 IST

इतिहासाची साक्ष देणारे अनेक किल्ले, गड, मंदिरे जिल्ह्यात ठिकठिकाणी आहेत. चंद्रपुरातील परकोट, गोंड राजाची समाधी आणि शहरासभोवतलाही...

प्रशासन आणि पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष : राजेश बेले यांचा आरोपचंद्रपूर : इतिहासाची साक्ष देणारे अनेक किल्ले, गड, मंदिरे जिल्ह्यात ठिकठिकाणी आहेत. चंद्रपुरातील परकोट, गोंड राजाची समाधी आणि शहरासभोवतलाही ऐतिहासीक प्राचीन वास्तू चंद्रपूरचे ऐतिहासीक वैभव सांगत आहेत. मात्र, मागील काही वर्षापासून परकोटालगत होत असलेले अतिक्रमण चंद्रपूर शहराचे ऐतिहासिक वैभव नष्ठ करीत आहे.शहरात वाढत असलेल्या अतिक्रमणाकडे पुरातत्व विभाग आणि जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे चंद्रपूरचे ऐतिहासिक वैभव नष्ट होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी पत्रपरिषदेत केला. चंद्रपूरचा इतिहास इ.स. १४६१ ते १५७२ पासूनचा आहे. अनेक गोंडकालीन राजांनी येथे राज्य केले. भद्रावती, बल्लारपूर, माणिकगड येथे इतिहासाची पुरावे सापडतात. चंद्रपूर गोंड राजाची राजधानीच होती. प्राचीन चंद्रपूरच्या सुरक्षेसाठी संपूर्ण शहराच्या सभोवताल परकोट असून चार मुख्य प्रवेशद्वार, आठ खिडक्या आहेत. महाकाली मंदिर, अंचलेश्वर मंदिर आणि गोंड राजाची समाधी याचे अस्तित्व आजही शहरात बघायला मिळत आहे. मात्र परकोटालगत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बांधकाम केले आहे. आजही अनेक ठिकाणी परकोट तोडून अवैध बांधकाम सुरु आहेत. दिवसाढवळ्या हे बांधकाम होत असतानाही महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व विभागही निमुटपे पाहत आहे. या अतिक्रमणामुळे शहराचे ऐतिहासीक वैभव नष्ट होत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी अतिक्रमण हटविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)