शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकावरील हिरकणी कक्ष बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:24 IST

चंद्रपूर : स्तनदा मातांना प्रवासादरम्यान बाळाला स्तनपान करता यावे यासाठी प्रत्येक बसस्थानकावर हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले आहे. ...

चंद्रपूर : स्तनदा मातांना प्रवासादरम्यान बाळाला स्तनपान करता यावे यासाठी प्रत्येक बसस्थानकावर हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले आहे. मात्र, जिल्ह्यातील अर्ध्याअधिक बसस्थानकावर हा कक्ष नाही. ज्या ठिकाणी आहे तिथे अत्यंत्य दुरवस्था झाली आहे. त्यामुळे स्तनदा मातांना उघड्यावरच स्तनपान करावे लागत आहे. विशेष म्हणजे, पहिला स्तनपान कक्ष स्थापन करण्याचा मान चंद्रपूर आगाराला आहे. त्यानंतर राज्यातील इतर आगारात हा कक्ष स्थापन करण्यात आला. मात्र, ज्या उद्देशासाठी हा कक्ष स्थापन करण्यात आला त्याला तिलांजली दिली जात आहे. सुरुवातीला जिल्ह्यातील आगारात हा कक्ष चांगल्या प्रकारे सुरू होता. स्तनदा माताही याचा लाभ घेत होत्या. विशेष म्हणजे, बसण्यासाठी योग्य जागा, फॅन, खिडक्यांना पडदे, आदी सुविधाही पुरविण्यात आल्या होत्या. मात्र, आता यातील काहीच शिल्लक नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, सुविधाच नसल्याने स्तनदा माता या केंद्राकडे जातसुद्धा नसल्याचे चित्र आहे.

चंद्रपूर आगारामध्ये राज्यात पहिल्यांदाच हा कक्ष स्थापन करण्यात आला होता. यानंतर राज्य सरकारने प्रत्येक आगारात कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रत्येक आगारात कक्ष स्थापन करण्यात आला. या कक्षाच्या स्थापनेनंतर महिलांनी याचे स्वागतही केली. मात्र, आता आगारातील हा कक्ष दुर्लक्षित झाला आहे. चंद्रपूर आगारात सद्य:स्थितीत नावालाच हा कक्ष शिल्लक आहे. या कक्षामध्ये साधे नामफलकसुद्धा नाही. त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांना हिरकणी कक्षाची माहितीसुद्धा नाही. विशेष म्हणजे, आगारातील अनेक कर्मचाऱ्यांनाही या कक्षाबद्दल साधी माहिती नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

--

जागा मिळेल तिथेच स्तनपान

चंद्रपूर येथे नव्याने बसस्थानक बांधण्यात येत आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात बसस्थानक उभारण्यात आले आहे. या बसस्थानकामध्ये एका छोट्याच्या खोलीत हा कक्ष आहे. मात्र, कक्षासंदर्भात कुठेच माहिती नाही. साधा नामफलकसुद्धा लावण्यात आला नाही. त्यामुळे स्तनदा महिला हा कक्ष शोधण्याच्या भानगडीत न पडता जिथे जागा मिळेल तिथेच त्यांना स्तनपान करावे लागत आहे.

--

कक्षाच्या समोरच स्तनपान

चंद्रपूर आगारातील हिरकणी कक्षाची अवस्था बिकट आहे. माहितीच होत नसल्यामुळे महिला अगदी कक्षाच्या बाहेर बसून स्तनपान करीत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अधिकाधिक स्तनदा मातांनी या कक्षाचा उपयोग करावा यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.

बाॅक्स

राज्यात चंद्रपुरात पहिली संकल्पना

बाळाला नि:संकोचपणे स्तनपान करता यावे, त्यांच्यावर अन्याय होऊ नये, ते सुदृढ व्हावे यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील टेमुर्डा येथील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डाॅ. किशोर भट्टाचार्य यांनी ही संकल्पना अस्तित्वात आणली. त्यानंतर चंद्रपूर आगारात पहिले हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले. याचा लाभही अनेक स्तनदा मातांनी घेतला. दरम्यान, राज्य तसेच केंद्र सरकारनेही याची दखल घेत त्यांचा सत्कारही केला.

कोट

बाळाला आत्मसन्मानाने स्तनपान करता यावे यासाठी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली होती. मात्र, बाळांना न्याय मिळत नसून येणाऱ्या पिढीच्या सुदृढतेकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक माता आजही प्रवासादरम्यान स्तनपान करीत नसल्याची स्थिती आहे. यासाठी समाजामध्ये जनजागृती होणे गरजेचे असून आगार प्रशासन, समाजानेही या कक्षाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

-डाॅ. किशोर भट्टाचार्य

वैद्यकीय अधिकारी, चंद्रपूर