शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी संच निर्धारणाला उच्च न्यायालयाची स्थगिती

By admin | Updated: November 2, 2014 22:32 IST

शैक्षणिक सत्र २०१३-१४ कर्मचारी संच निर्धारणाविरुद्ध शिक्षण विभागाला आवाहन देणारी याचिका नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागो गाणार व शाळा व्यवस्थापक संघ यांच्या संयुक्त

चंद्रपूर : शैक्षणिक सत्र २०१३-१४ कर्मचारी संच निर्धारणाविरुद्ध शिक्षण विभागाला आवाहन देणारी याचिका नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागो गाणार व शाळा व्यवस्थापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. सदर याचिकेवर सुनावणी घेत न्यायमूर्ती गवई व न्यायमूर्ती देशपांडे यांनी २९ आॅक्टोंबर रोजी स्थगिती दिल्याची माहिती आ. गाणार यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.बालकांचा मोफत व सक्तीच्या अधिनियमातील तरतुदीनुसार करण्यात आलेल्या शैक्षणिक सत्र २०१३-१४ च्या कर्मचारी संच निर्धारणामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरल्यामुळे व हजारो शिक्षण सेवकांच्या सेवेवर गंडांतर आले. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार व अमरावती जिल्हा शाखा व्यवस्थापक संघ यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल करण्यात आली होती. सदर याचिकेवर निर्णय देत शैक्षणिक सत्र २०१३-१४ च्या कर्मचारी संच निर्धारणाला स्थगिती दिल्यामुळे हजारो शिक्षक व शिक्षण सेवकांना दिलासा मिळाला आहे.शैक्षणिक सत्र २०१३-१४ मध्ये दिलेल्या कर्मचारी संच निर्धारणानुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या नियमात तरतुद नसताना वेतन थांबविण्याचे आदेश दिले. तसेच अतिरिक्त शिक्षण सेवकाची सेवा समाप्त करण्याचा आदेशसुद्धा नियमबाह्यपणे देण्यात आले होते. सदर संच निर्धारण शिक्षकांवर अन्यायकारक असल्यामुळे आमदार गाणार यांनी शासनाला वेळोवेळी निवेदने दिली. परंतु शासनाची शिक्षकांविरुद्धची कृती लक्षात घेता आमदार गाणार यांनी उच्च न्यायालयात शिक्षण विभागाला आवाहन देणारी याचिका दाखल केली. याचिका कर्त्याच्यावतीने अ‍ॅड. आनंद परचुरे यांनी बाजू मांडली.शैक्षणिक सत्र २०१३-१४ च्या कर्मचारी संच निर्धारण आर.टी.ई. नुसार करण्यात आले; परंतु त्यामध्ये चुकीचे सुत्र वापरून शिक्षकांची संख्या चुकीच्या पद्धतीने ठरविली व नियमबाह्यपणे हजारो शिक्षकांना अतिरिक्त ठरविले. परिणामी मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे आर.टी.ई.चा भंग झालेला होता. प्रत्यक्षात माध्यमिक शाळा ५ ते १० असल्यामुळे अधिकतर शिक्षक ठरविण्याबाबत शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना नव्हत्या. तरीही नियमबाह्य काम सुरू होते. (प्रतिनिधी)