शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नागभीडमधून जड वाहतूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 06:00 IST

नागभीड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे विविध कामाच्या निमित्ताने येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या मोठया प्रमाणावर आहे. याशिवाय या ठिकाणी तीन महाविद्यालये, तीन कनिष्ठ महाविद्यालये, तीन माध्यमिक विद्यालये, तीन प्राथमिक शाळा, तीन - चार कॉन्व्हेंट आहेत. या शैक्षणिक प्रतिष्ठानांचे हजारोच्या घरात असलेले विद्यार्थी व विद्यार्थिर्नी शहरातील रस्त्यांनीच अवागमन करीत असतात.

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड शहरामधून जड वाहतूक सर्रास सुरू आहे. नागभीड नगर परिषदेने जड वाहतूक बंद करण्याचा ठराव पारित करून घेतला होता. पण या ठरावाची अंमलबजावणी शून्य आहे. नागभीडमधून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर या जड वाहतुकीचा रविवारी अनेकांना प्रत्यय आला. यावेळी काहिशी वाहतूकही खोळंबली होती.नागभीड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे विविध कामाच्या निमित्ताने येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या मोठया प्रमाणावर आहे. याशिवाय या ठिकाणी तीन महाविद्यालये, तीन कनिष्ठ महाविद्यालये, तीन माध्यमिक विद्यालये, तीन प्राथमिक शाळा, तीन - चार कॉन्व्हेंट आहेत. या शैक्षणिक प्रतिष्ठानांचे हजारोच्या घरात असलेले विद्यार्थी व विद्यार्थिर्नी शहरातील रस्त्यांनीच अवागमन करीत असतात. या अवागमनाला सामावून घेण्याची पात्रता येथील रस्ते हरवून बसले आहेत.यात आणखी भर म्हणजे येथील अनेक दुकानदारांनी दुकानांसमोरच रस्त्याच्या कडेला शेडची उभारणी करून त्यातच दुकाने थाटल्याने हे रस्ते चांगलेच संकुचित झाले आहेत. यावर कळस असा कीयेथील मोठे व्यापारी बिनदिक्कत मोठया वाहनांनी मालाची ने - आण करीत असतात. यावेळी माल उतरविण्यास दहा ते पंधरा मिनिटांचा अवधी लागत असल्याने नागभीडच्या रस्त्यांनी रोज होणारी वाहतूक चांगलीच प्रभावित होत असते. याशिवाय दोन वाहने एकमेकांसमोर आली की १० ते १५ मिनिटे ताटकळत राहावे लागते. शहरातून होणारी ही जड वाहतूक बंद करावी, अशी ग्रामपंचायतीच्या काळापासून मागणी होत होती. मात्र या मागणीकडे सातत्याने दुर्लक्षच करण्यात आल्याने या समस्येने गंभीर रूप घेतले आहे.दरम्यान, तीन वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या नागभीड नगर परिषदेने शहरातून होत असलेली जड वाहतूक बंद करण्याचा ठराव पारित केल्याने नागभीडकरांमध्ये समाधान व्यक्त होत होते. मात्र या ठरावाची अंमलबजावणी कुठेच होताना दिसत नाही. आजही जड वाहतूक सर्रास सुरू असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी