शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची मुसळधार व रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 05:00 IST

बुधवारी दिवसभर पावसाची सकाळपासून रिपरिप सुरू होती. या पावसाने सोयाबीन पिकाला चांगलाच फटका बसला आहे. सोयाबीन कापणीला झाल्यानंतर शेतकऱ्यांनी लगबगीने सोयाबीन पिकांची कापणी करून शेतात वाळण्यासाठी सोयाबीनचे लहान-लहान ढीग करून ठेवले आहे. परंतु अचानक पडलेल्या पावसाने कापणी करून ठेवलेले सोयाबीन पीक भिजल्याने जागेवरच खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देखरीप पिकांना जबर फटका : शेतकरी पुन्हा संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरसह जिल्ह्यात सर्वत्र बुधवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. पावसाची झड असावी, अशी पावसाची रिपरिप दिवसभर सुरू होती. या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील धान पीक अक्षरश: झोपून गेले. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन शेतातच कापून ठेवले होते. तेदेखील पावसात भिजून मोठे नुकसान झाले आहे.चंद्रपुरात बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. प्रारंभी तासभर मुसळधार स्वरुपाचा पाऊस बरसला. त्यानंतर पावसाचा वेग काहिसा कमी झाला.मात्र पावसाची रिपरिप रात्रीपर्यंत सुरूच होती. पावसाळा गेला असे समजून अडगळीत टाकलेल्या छत्र्या, रेनकोट नागरिकांना पुन्हा बाहेर काढावे लागले. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्वच भागात हा परतीचा पाऊस बरसला.कापून ठेवलेले सोयाबीन पावसात भिजलेबुधवारी दिवसभर पावसाची सकाळपासून रिपरिप सुरू होती. या पावसाने सोयाबीन पिकाला चांगलाच फटका बसला आहे. सोयाबीन कापणीला झाल्यानंतर शेतकऱ्यांनी लगबगीने सोयाबीन पिकांची कापणी करून शेतात वाळण्यासाठी सोयाबीनचे लहान-लहान ढीग करून ठेवले आहे. परंतु अचानक पडलेल्या पावसाने कापणी करून ठेवलेले सोयाबीन पीक भिजल्याने जागेवरच खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. राजुरा तालुक्यात बहुतांश ठिकाणी बुधवारी पाऊस झाल्याने गोवरी, सास्ती, माथरा, चिंचोली, गोयेगाव, अंतरगाव, पोवनी, साखरी, वरोडा, मानोली, बाबापूर, कढोली(बू) परिसरातील खरिपातील सोयाबीन आणि कापूस पिकाला मोठा फटका बसला.सोयाबीन,कापूस पीक उद्ध्वस्तखरीप हंगामातील हाती येणारे सोयाबीन व कापूस पीक अशा अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकºयांच्या डोळ्यादेखत उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अगदी सोयाबीन काढणीच्या सुरुवातीलाच सोयाबीन पिकांना पावसाचा फटका बसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे.धान पीक भुईसपाटसिंदेवाही, मूल, नागभीड, चिमूर, ब्रह्मपुरी, पोंभूर्णा, बल्लारपूर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात आली. हे पीक सध्या डोलात असतानाच बुधवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे हे पीक झोपून भुईसपाट झाले. त्यामुळे धानाचा दर्जा खालवण्याचा धोका निर्माण झाला आहे.थंडीची चाहुलआॅक्टोबर महिना सुरू झाला आहे. एरवी ऑक्टोबर महिन्यात गुलाबी थंडी पडू लागते. मात्र यावेळी ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा लोटायला आला तरी वातावरणात गरमी व उकाडा होता. मात्र बुधवारी आलेल्या पावसामुळे अचानक थंडीचीही चाहुल लागली. बुधवारी सायंकाळी थंडे वारे अंगाला झोंबू लागले होते.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती