शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य तपासणी करणे गरजेचे

By admin | Updated: February 26, 2017 00:50 IST

विदेशात आजाराविषयी खूप जागरुक्ता आहे. विदेशात खूप कमी व्यक्ती आजारी पडतात. देशात व विदेशात आजाराविषयी फरक जाणवतो.

पी. एम. मुरंबीकर : दंतरोग निदान व उपचार शिबिरचिमूर : विदेशात आजाराविषयी खूप जागरुक्ता आहे. विदेशात खूप कमी व्यक्ती आजारी पडतात. देशात व विदेशात आजाराविषयी फरक जाणवतो. विदेशात व्यक्तीला आजार नसेल तरी नियमीत आरोग्याची तपासणी केली जाते. मात्र आपल्याकडे आजारी पडलो तरी दवाखाण्यात जात नाही व आरोग्याची तपासणी करीत नाही. त्यामुळे आजाराचे प्रमाण आपल्याकडे वाढलेले आहेत. यावर मात करण्यासाठी आरोग्याची नियमीत तपासणी करावी, असे प्रतिपादन डॉ. पी.एस. मुरंबीकर यांनी केले. चिमूर उपजिल्हा रुग्णालयात नि:शुल्क दंत तपासणी, वैद्यकीय रोग निदान व उपचार शस्त्रक्रिया शिबिर आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पी.एम. मुरंबीकर बोलत होते.सदर शिबिराचे उद्घाटन चिमूरचे उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पी.एम. मुरंबीकर, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीराम गोगुलवार, डॉ.गावंडे, गटशिक्षण अधिकारी किशोर पिसे, चिमूर तालुका प्रेस असो.चे अध्यक्ष चुन्नीलाल कुडवे, नगरसेविका छाया कंचर्लावार, कल्पना इंदूरकर, जयश्री निवटे, उमेश हिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ. मुरंबीकर म्हणाले, पूर्वीचे व्यक्ती सहसा फारसे आजारी पडत नव्हते. त्याना मेहनतीचे काम करण्याची सवय होती. आपले विचार व सवयी योग्य असतील तर आपणाला दवाखाण्यात जाण्याची गरज नाही. आरोग्यही चांगले राहील. व्यक्ती हा दिवसेंदिवस व्यसनाधीन होत आहे. रोज चंद्रपुरात दहा क्विंटल खर्राची सुपारी विकली जाते. पूर्वीच्या काळी मानवायीकांना जेवणानंतर सोप, ओवा, आवळा सुपारी दिली जात होती. मात्र आधुनिक काळात जेवणानंतर खर्रा दिला जातो. या सवयी बदलने आवश्यक आहे. तरच आपले आरोग्य चांगले राहील. आजार जरी जळला नसेल तरीही आरोग्य तपासणी करुन डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. असे ते म्हणाले.कार्यक्रमाचे संचालन सुमेध साखरे, प्रास्ताविक डॉ.अश्विन अमडे, आभार डॉ.दिगांबर मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)