शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकांचा आठव्या वर्गाला ठेंगा

By admin | Updated: July 7, 2014 23:30 IST

आरटीई अ‍ॅक्टनुसार जिल्हा परिषदेच्या शाळांत पाचवा आणि आठवा वर्ग सुरू करण्याचे निर्देश आहेत. माात्र अजूनही जिल्हा परिषदेच्या ६० शाळांमध्ये अद्यापही आठवा वर्गच सुरू करण्यात आला नाही.

प्रशासकीय दुर्लक्ष : ६० शाळांचा समावेशचंद्रपूर : आरटीई अ‍ॅक्टनुसार जिल्हा परिषदेच्या शाळांत पाचवा आणि आठवा वर्ग सुरू करण्याचे निर्देश आहेत. माात्र अजूनही जिल्हा परिषदेच्या ६० शाळांमध्ये अद्यापही आठवा वर्गच सुरू करण्यात आला नाही. परिसरातील खासगी संस्थाचालकांच्या स्वार्थासाठी मुख्याध्यापकांनी विद्यार्थी नसल्याचे कारण पुढे करून आठवा वर्ग सुरू केला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या १ हजार १६३ प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहेत. या शाळांत पाचवा आणि आठवा वर्ग सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. ८२३ शाळांत पाचवा, तर ३१३ शाळांमध्ये आठवीचे वर्ग सुरू होणार होते. या वर्गांना शिकविण्याची जबाबदारी अतिरिक्त ठेवलेल्या शिक्षक, मुख्याध्यापकावर सोपविली जाणार होती. मात्र ६० शाळांतील मुख्याध्यापकांनी खासगी संस्थाचालकांपुढे नांगी टाकत वरिष्ठांकडे विद्यार्थी नसल्याचे कारण समोर केले आहे. ज्या शाळांत आठवा वर्ग सुरू होणार आहे. याच परिसरात खासगी संस्थांंच्या शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊन १५ दिवसांचा कालावधी लोटला आहे. मात्र अजूनही ६० शाळांमध्ये आठवा वर्ग सुरू झाले नाही. पाचव्या वर्गाचीही अशीच परिस्थिती आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्यांना खासगी शाळेत पुन्हा प्रवेश घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे. हे वर्ग सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी टीसी न देण्याबाबत सांगितले होते. (शहर प्रतिनिधी)