शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

शाळेतील संस्कार त्याने आचरणात आणले

By admin | Updated: February 13, 2016 00:40 IST

शाळेत मिळणाऱ्या संस्काराला पर्याय नाही असे म्हणतात. या संस्काराची प्रचिती ‘प्रसाद’ने आपल्या आचरणातून आणून दिले ...

चंद्रपूर : शाळेत मिळणाऱ्या संस्काराला पर्याय नाही असे म्हणतात. या संस्काराची प्रचिती ‘प्रसाद’ने आपल्या आचरणातून आणून दिले आणि एका पक्ष्याचे जीव वाचविले. प्रसादच्या या कार्याची गावात प्रशंसा होत आहे.‘त्या’ दिवशी नागभीडच्या सरस्वती ज्ञान मंदिर विद्यालयात ‘झेप’ या निसर्ग संस्थेने शाळेच्या आणि संस्थेच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून पक्षी, साप, कीटक या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या शाळेचा विद्यार्थी प्रसाद नवघडे याने हे मार्गदर्शन मनापासून ऐकले आणि तो घरी आला. जेवण वगैरे आटोपून तो कॉलरीला लागून असलेल्या क्षेत्रात नेहमीप्रमाणे गेला. यावेळी शेतातील एका बांधात एक पक्षी अतिशय रक्तबंबाळ अवस्थेत तडफडत असल्याचे त्याला दिसून आले. त्याने क्षणाचाही विलंब न लावता त्याने आपल्या अंगातील टी शर्ट काढली आणि जखमी अवस्थेत तडफडणाऱ्या त्या पक्षाला टी शर्टमध्ये गुंडाळले आणि त्याला घेऊन तो घरी आला व आपल्या बालबुद्धीप्रमाणे त्या पक्ष्यास पाणी पाजून दाणे दिले. त्यानंतर त्याने वडिलांना फोन करुन याची माहिती दिली. वडिलांनी लगेच झेपच्या कार्यकर्त्यांना या पक्ष्याबद्दल माहिती दिली.या माहितीनुसार झेपचे पवन नागरे, अमित देशमुख, समीर भोयर यांनी प्रसादच्या घरी येवून अतुल येरमे यांच्या मार्फत या जखमी पक्ष्यावर उपचार प्राथमिक उपचार करुन घेतले. जखम मोठी असल्याने या पक्ष्यास नंतर नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात पाठविण्यात आले. प्रसादने दाखविलेल्या या तत्परतेबद्दल सरस्वती ज्ञान मंदिरचे अध्यक्ष संजय गजपुरे, मुख्याध्यापक गोकुळ पानसे, पराग भानारकर आशिष गोंडाणे, सतीश जीवतोडे, पंकज दरवरे यांनी कौतुक केले आहे. (प्रतिनिधी)