शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

मराठी शिकविणाऱ्या गुरूजींची मुले शिकतात इंग्रजी शाळेत

By admin | Updated: May 22, 2015 01:22 IST

एकीकडे पटसंख्येमुळे जिल्हा परिषद शाळांचे भवितव्य धोक्यात आले असताना त्याच शाळांत शिकविणाऱ्या शिक्षकांची मुले मात्र खासगी इंग्रजी शाळांमध्ये शिकत असल्याचे विपरीत चित्र या भागात पहायला मिळते.

वनसडी: एकीकडे पटसंख्येमुळे जिल्हा परिषद शाळांचे भवितव्य धोक्यात आले असताना त्याच शाळांत शिकविणाऱ्या शिक्षकांची मुले मात्र खासगी इंग्रजी शाळांमध्ये शिकत असल्याचे विपरीत चित्र या भागात पहायला मिळते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. इंग्रजी शाळांमुळे अंगणवाडी व मराठी शाळेला मुले मिळत नाहीत. कमी पटसंख्येमुळे या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. असेच चित्र कोरपना तालुक्यात पहावयास मिळते. चार-पाच शाळांमध्ये तर विद्यार्थी संख्या १० च्या आत आहे. कुठे तीन-चार विद्यार्थी आहेत. या शाळेवर मासिक खर्च लाखाच्या वर आहे. वर्ग चार विद्यार्थी चार आणि शिक्षक दोन या दोन शिक्षकांचा पगार लाखाच्या वर आहे.दिवसेंदिवस इंग्रजी शाळांच्या प्रभावामुळे मराठी माध्यमांच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत. मराठी शाळेत कार्यरत शिक्षक आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत प्रवेश देण्यासाठी तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा रस्ता पकडून खुशाल ते या ठिकाणाहून ये-जा करतात. त्यांचा स्वत:चाच विश्वास मराठी शाळांतील शैक्षणिक दर्जावर नाही. मग इतरांनी तो का ठेवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नेहमीच कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाचा प्रश्न गाजत असतो. पण त्याच्या मुळाशी कोणी जाण्याचा प्रयत्न केला नाही. आज प्रत्येक विभागातील कर्मचारी तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणाहून ये-जा करताना दिसून येतात. आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत प्रवेश देण्यासाठी सगळ्यांशी तडजोड करुन आपले वास्तव्य शहरात करतो.जो शिक्षक ४०-५० किलोमिटर अंतरावरुन ये-जा करतो, त्या शिक्षकांची मानसिकता वर्गात शिकविण्याची राहील काय? त्याला पुन्हा परत जाण्याची घाई राहील. मग अशा शाळेत मुले घडणार कशी? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. एवढ्या अंतराहून ये-जा केल्याने त्यांना सहाजिकच थकवा जाणवायला लागेल. त्यामुळे शाळेत लक्ष कमी व ये-जा करण्यात जास्त, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची भूमिका सुद्धा तीच असते. गुरुजी आपली मुले इंग्रजी शाळेत पाठवितात मग आमची मराठी शाळेत का? असा प्रश्न शाळेत विद्यार्थी दाखल करताना पालकांकडून विचारला जातो. इंग्रजी शाळेचा वाढता प्रभाव लक्षात घेता मराठी शाळेचे महत्व कमी झालेले दिसते. शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती नसो पण किमान कमीत कमी अंतराहून ये-जा केल्यास त्याचा फायदा शिक्षकांना आणि शाळेला सुद्धा होईल. द्विशिक्षकी जिल्हा परिषद शाळेची तर अवस्था अतिशय दयनीय आहे. नावाला दोन शिक्षक, पण खऱ्या अर्थाने एकच शिक्षक तेथे काम करताना दिसतो.(वार्ताहर)