शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी केली उद्यानाची पाहणी

By admin | Updated: September 10, 2016 00:44 IST

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज शुक्रवारी बल्लारपूर मार्गावरील भारतरत्न डॉ.ऐ.पी.जे अब्दुल कलाम आझाद निसर्ग उद्यानाची पाहणी करुन ...

चंद्रपूर : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज शुक्रवारी बल्लारपूर मार्गावरील भारतरत्न डॉ.ऐ.पी.जे अब्दुल कलाम आझाद निसर्ग उद्यानाची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांच्यासोबत वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, वनविकास महामंडळाचे महाव्यवस्थापक एस.एस.डोळे, विभागीय व्यवस्थापक एस.बी.पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.पालकमंत्र्यांनी उद्यानातील भारतरत्न डॉ.ऐ.पी.जे अब्दुल कलाम आझाद यांच्या पुर्णाकृती पुतळयाला पुष्प वाहिले. त्यांनी उद्यानाची पाहणी करुन उद्यानाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उपयुक्त सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. लक्ष्मणझुल्याची पाहणी करुन उद्यानात कोणतीही अनुचित घटना होणार नाही, या दृष्टीने काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. उद्यानातील तलावात राजहंस किंवा सिकारा पक्ष्यांच्या आकाराची पायडल बोट तसेच उद्यानात प्राणी व पक्ष्यांच्या प्रतिकृतीचे बेंचेस पर्यटकांना बसण्यासाठी तयार करण्यात यावे. तसेच उद्यानामध्ये कोणकोणत्या सुविधा निर्माण करावयाच्या आहेत. या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. (शहर प्रतिनिधी)