शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

निलंबन रद्द करण्यासाठी ग्रामसेवकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2016 01:29 IST

पंचायत समिती सावली अंतर्गत येत असलेल्या कढोली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एच.एम. मने यांच्यावर गैरव्यवहाराचा ठपका ठेवून निलंबीत करण्यात आले.

सावली तालुका : सूडबुद्धीने कार्यवाही केल्याचा आरोपसावली : पंचायत समिती सावली अंतर्गत येत असलेल्या कढोली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एच.एम. मने यांच्यावर गैरव्यवहाराचा ठपका ठेवून निलंबीत करण्यात आले. त्यांच्यावर अन्याय झाला असून प्रशासनाने त्यांचे निलंबन रद्द करावे याकरिता तालुक्यातील ग्रामसेवकांनी मंगळवारपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत गैरव्यवहार झाल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन निर्णय क्र. मग्रारोहयो/ २०११/ प्र.क्र. ४०/ रोहयो १० अ. २ मे २०११ अन्वये ग्रामरोजगार सेवकांना त्यांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. त्यानुसार ग्रामरोजगार सेवकाने कामावरील हजेरीपट भरणे व हजेरी पटाप्रमाणे मजूर उपस्थित आहे किंवा नाही याची शहनिशा करणे व हजेरीपठ सांभाळणे आदी सर्वस्वी जबाबदारी ग्रामरोजगार सेवकांची असताना त्याला दोषी न ठरविता ग्रामसेवकाची हजेरीपटावर प्रती स्वाक्षरी करणे एवढीच जबाबदारी असताना सुद्धा ग्रामसेवकावर सुडबुद्धीने निलंबनाची कार्यवाही करण्यात आली. ग्रामसेवक मने यांच्यावर झालेली कार्यवाही अन्यायकारक आहे. त्यामुळे ग्रामसेवक संघटना या अन्यायकारक कृतीचा जाहीर निषेध करून १२ जानेवारीपासून असहकार आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.पत्रकान्वये आंदोलनादरम्यान ग्रामसेवक साज्यातील सर्व कामे सुरळीत पार पडतील. मात्र कोणतेही शासकीय अहवाल सादर करण्यात येणार नाही. आंदोलनाच्या कालावधीत पंचायत समिती स्तरावरील मासीक व पाक्षीक सभेवर बेमुदत बहिष्कार टाकण्यात येईल. कोणताही दस्तऐवज अधिकाऱ्यांना दप्तर तपासणीकरीता उपलब्ध करून दिला जाणार नाही. तसेच रोजगार हमी योजनेंतर्गत कामावरील हजेरीपट काढणे व हजेरीपटावर प्रतीस्वाक्षरी करण्यात येणार नाही, असे कळविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)