राजकारणातील देवमाणूस गमावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:26 IST2021-05-17T04:26:13+5:302021-05-17T04:26:13+5:30

चंद्रपूर : काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाला, आम्हा सर्व काँग्रेसजनांना प्रचंड मोठा धक्का बसला ...

The godman in politics lost | राजकारणातील देवमाणूस गमावला

राजकारणातील देवमाणूस गमावला

चंद्रपूर : काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाला, आम्हा सर्व काँग्रेसजनांना प्रचंड मोठा धक्का बसला आहे. अत्यंत प्रामाणिक, पक्षश्रेष्ठींनी दिलेले काम चोखपणे बजावणारे, पक्षश्रेष्ठींचे अत्यंत जवळचे विश्वासपात्र नेते, चुकल्यावरही न रागावता समजावून सांगणारे मितभाषी असलेला राष्ट्रीय नेता, अशी स्वत:ची स्वतंत्र ओळख असलेला राजकारणातील देवमाणूस आपल्यातून हरपला आहे, अशा शब्दात राज्याचे बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसनमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या तरुण वयात जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. गुजरातसारख्या राज्याचे प्रभारी म्हणून त्यांनी पार पडलेली जबाबदारी, हीच त्यांच्या कार्याची पावती आहे. बहुजनांचा नेता म्हणून नेतृत्व करीत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात स्थिरावून भविष्यातील राष्ट्रीय राजकारणातील नेता म्हणून भिस्त होती, असा नेता आज आम्ही गमावला आहे, अशा शब्दांत ना. विजय वडेट्टीवार यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

Web Title: The godman in politics lost