शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासाला ज्ञानाची जोड द्यावी

By admin | Updated: March 26, 2015 00:54 IST

आजचे युग स्पर्धेचे आहे. परिस्थितीचा विचार न करता आत्मविश्वासाने स्पर्धेला सामारे जाण्याची मानसिकता बाळगा, जिद्द, चिकाटी व परिश्रमाने इच्छाशक्तीच्या बळावर स्पर्धेची तयारी करा. ..

बल्लारपूर: आजचे युग स्पर्धेचे आहे. परिस्थितीचा विचार न करता आत्मविश्वासाने स्पर्धेला सामारे जाण्याची मानसिकता बाळगा, जिद्द, चिकाटी व परिश्रमाने इच्छाशक्तीच्या बळावर स्पर्धेची तयारी करा. यश खात्रीने मिळते, विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासाला ज्ञानाची जोड दिल्यास उत्कर्षाचा मार्ग निश्चित गाठता येते, असे मत येथील तहसीलदार तथा परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी कल्पना निळे यांनी केले.बल्लारपूर पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या वतीने आयोजित ग्रामीण भागातील मुलींसाठी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिर मंगळवारी आयोजित करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंग यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पंचायत समिती उपसभापती अनेकश्वर मेश्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी सभापती अ‍ॅड. हरिष गेडाम, माजी उपसभापती सुमन लोहे, संवर्ग विकास अधिकारी भुजंगराव गजभे, बाल विकास प्रकल्प अधिकारी विजय पेंदाम तर मार्गदर्शक म्हणून तहसीलदार कल्पना निळे, आयटीआयचे प्राचार्य अनुप खुटेमाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. के. सिंगनजुडे यांची उपस्थिती होते.यावेळी आर. के. सिंगनजुडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा स्पर्धा परिक्षे संदर्भात व अनुप खुटेमाटे यांनी यशाला गवसनी घालण्यासंदर्भात विविध उदाहरणे सांगून स्पर्धा परिक्षेला सामोरे जाण्यासाठी ध्येय समोर ठेवण्याचे सांगितले. दरम्यान उच्च शिक्षण घेण्यासाठी दारिद्र्यरेषेखालील मुलींना प्रत्येकी २० हजार रुपये धनादेश अनुदान म्हणून मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यात दहेली येथील शितल माणिक देरकर व सोनाली विलास राजुरकर, लावारी येथील स्वाती अशोक राठोड व कळमना येथील सूवर्णा देवराव सोनटक्के यांचा समावेश आहे. याप्रसंगी काही विद्यार्थिंनीनेही आपले मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविकात विजय पेंदाम यांनी स्पर्धा परीक्षेचे महत्व विषद केले. यावेळी अनेकश्वर मेश्राम, हरिष गेडाम, सुमन लोहे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन वैशाली दुधाने यांनी तर आभार कल्पना देवगडे यांनी मानले. शिबिराला परिसरातील मुलींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)