शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना रोख रक्कम व साहित्याची भेट

By admin | Updated: November 17, 2015 02:03 IST

तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर

पोंभुर्णा : तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी घरी जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली व भाऊबीजेनिमित्त त्यांना घरगुती साहित्य, साडी-चोळी व रोख रक्कम भेटस्वरूपात देण्यात आले.सततच्या नापिकीमुळे पोंभूर्णा तालुक्यातील पोंभुर्णा, घोसरी, पिपरी देशपांडे येथील शेतकऱ्यांनी नापिकीमुळे कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचे सावट कोसळले. त्यामुळे भाऊबीजेच्या सणाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर यांनी पोंभुर्णा येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी डोमाजी गुरुनुले यांच्या घरी येऊन त्यांची विधवा पत्नी वैशाली गुरुनुले तसेच पिपरी देशपांडे येथील विधवा जनाबाई भिवाजी देशमुख आणि घोसरी येथील विधवा वंदना विजय लोनबले या तीनही महिलांना साडीचोळी, घरगुती साहित्य व रोख रक्कम यावेळी भेटवस्तू म्हणून देण्यात आली.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अडचणी जाऊन घेतल्या तसेच आपण जर व्यवसाय करण्यास उत्सुक असाल तर आपल्याला बँकेमार्फत कर्जाची पूर्तता करून देण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणात काही अडचणी निर्माण झाल्यास पोंभुर्णा येथील तहसीलदारामार्फत आम्हाला कळविल्यास आम्ही आपल्याला जरूर मदत करू, असे आश्वासनसुद्धा जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी उपस्थित विधवांना व त्यांच्या आप्तांना यावेळी दिले.यावेळी त्यांच्यासोबत पोंभूर्णाचे नायब तहसीलदार श्रीनिवास तनगुलवार, जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपीक राजू धांडे, जिल्हा नाझर सुनील तुंगीडवार, शैलेश धात्रक, मनोज आकनुरवार, मंडळ अधिकारी संजय कानकाटे, तलाठी आर.बी. लोणकर, प्रमोद काळे, आशीष भसारकर आदी कर्मचारी उपस्थित होते. डॉ.दीपक म्हैसेकर हे पोंभुर्णा येथे आल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी महिलांसह नागरिकांनी गर्दी केली. परंतु कार्यक्रम आटोपल्यानंतर म्हैसेकर निघून गेले. त्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला. (तालुका प्रतिनिधी)