शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

घोटेकर, खंडेलवाल, भोयर नवे सभापती

By admin | Updated: April 16, 2015 00:40 IST

चंद्रपूर महानगरपालिकेच्या झोन सभापती पदासाठी आज बुधवारी मनपाच्या सभागृहात निवडणूक पार पडली. यात

आघाडीचेच वर्चस्व : मनपाच्या झोन सभापतींची निवडणूक शांततेतचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या झोन सभापती पदासाठी आज बुधवारी मनपाच्या सभागृहात निवडणूक पार पडली. यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीचे अंजली घोटेकर, अजय खंडेलवाल व सचिन भोयर विजयी झाले. आजपासून पुढील एक वर्ष त्यांचा कार्यकाळ असणार आहे.चंद्रपुरात महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर शहराची हद्दही वाढत जाईल, हे गृहित धरून व नागरिकांना किरकोळ कामासाठी गांधी चौकातील मनपा कार्यालयात हेलपाट्या माराव्या लागू नये, यासाठी शहराचे तीन झोनमध्ये विभाजन करण्यात आले. झोन कार्यालयात जन्म-मृत्यू, कर, विविध दाखले आदी सर्व कामे होतील, अशी व्यवस्था या झोन कार्यालयात करण्यात आली आहे. या झोनचा कार्यभार सांभाळण्यासाठी झोन प्रमुखाचे पदही निर्माण करून अधिकाऱ्यांची त्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या झोनचे प्रमुख पदाधिकारी झोन सभापती असतात. यापूर्वी झोन क्रमांक १ मध्ये रवी गुरुनुले, झोन क्रमांक २ मध्ये विना खनके तर झोन क्रमांक ३ मध्ये विलास जोगेकर हे सभापतीपदी आरूढ होते. त्यांचा एक वर्षांचा कार्यकाळ आज संपला. त्यामुळे नवीन सभापती पदांसाठी आज निवडणूक घेण्यात आली. यासाठी महानगरपालिका कार्यालयाच्या सभागृहात एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता सभापतींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल होते. झोन क्रमांक १ च्या सभापती पदासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीच्या अंजली घोटेकर व पुगलिया गटाचे सकिना अन्सारी रिंगणात होत्या. मतदान प्रक्रियेनंतर निकाल घोषित करण्यात आला. यात अंजली घोटेकर यांना १४ मते प्राप्त झाली तर सकिना अन्सारी यांना सहाच मतांवर समाधान मानावे लागले. अंजली घोटेकर यांना विजयी घोषित करण्यात आले. झोन क्रमांक २ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीचे अजय खंडेलवाल तर पुगलिया गटाच्या विना खनके रिंगणात होत्या. विना खनके यांना सहाच मते मिळाली तर अजय खंडेलवाल १७ मते घेऊन विजयी झाले. झोन क्रमांक ३ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीचे सचिन भोयर तर पुगलिया गटाच्या सुनिता अग्रवाल रिंगणात होत्या. यात सचिन भोयर यांना विजयी घोषित करण्यात आले. ही निवडणूक प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंत देशमुख, स्थायी समिती सभापती रामू तिवारी, उपायुक्त बारई, काँग्रेसचे गटनेते संतोष लहामगे, नगरसेवक धनंजय हुड, दुर्गेश कोडाम, अनिल रामटेके, एस्तर शिरवार, राजेश अड्डूर, संदीप आवारी आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)