शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मतदार जागृतीसाठी गॅस वितरक सरसावले

By admin | Updated: October 12, 2014 23:43 IST

विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने योगदान देत आहेत. आता घरगुती गॅस वितरकांनीसुद्धा या राष्ट्रीय कार्यात उडी घेतली आहे.

चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने योगदान देत आहेत. आता घरगुती गॅस वितरकांनीसुद्धा या राष्ट्रीय कार्यात उडी घेतली आहे. विविध हँडबील व पोस्टरच्या माध्यमातून मतदानाचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात येऊ लागले आहे.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गॅस वितरकाने स्वयंस्फूर्तपणे मतदारजागृती मोहिमेत सहभाग घेतला आहे. प्रत्येक घराघरांत हँडबिल, पोस्टर पोहोचविण्याचे काम ते वितरक करीत आहेत. चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सूचित केल्याप्रमाणे जिल्ह्यातील एकूण ३७ एलपीजी वितरक, १५२२ रास्तभाव दुकानदार व १८२१ केरोसीन परवानाधारकांनी तत्परतेने येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना आवाहन केले आहे. त्यांच्या तालुक्यातील संघटनांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्याद्वारे सर्व विधानसभा मतदारसंघात पोस्टर, बॅनर्स लावलेले आहेत. हँडबिलची छपाई करुन संलग्नीत लाभार्थ्यांना त्यांचे वितरण करण्यात येत आहे. याद्वारे मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करीत आहेत.ही यंत्रणा सहभागी झाल्यामुळे व जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत मतदारजागृतीकरिता प्रयत्न करीत असल्याने येत्या विधानसभेच्या निवडणुकीत नक्कीच मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता आहे, असे विश्वास जिल्हा पुरवाठा अधिकारी रमेश आडे यांनी व्यक्त केला. मतदारजागृतीसाठी आज रविवारी सकाळी ७.३० वाजता महानगरपालिकेतर्फे गांधी चौक येथून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मतदान करा, हा संदेश देणारी सायकल रॅली शहरातील भागात जनजागृती करीत फिरली आदिवासी प्रकल्प विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सायकल रॅलीत सहभागी होऊन मतदार जागृतीत आणखी भर दिला.जिल्हा प्रशासनाकडून मागील सात दिवसांपासून मतदार जागृतीवर भर दिला असून आता नागरिकही मतदानाविषयी जागृत झाल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)