वीज तार चोरणारी १० जणांची टोळी जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 05:00 AM2020-07-04T05:00:00+5:302020-07-04T05:00:57+5:30

चंद्रपूर- गडचिरोली मार्गावर नवे पोल उभारून वीज तार जोडणी सुरु आहे. सुमारे ५ किमी अंतरावर जोडलेले वीज तार चोरट्यांनी पळवल्याची तक्रार अमोल नाडेमवार व लव गौरकार यांनी बुधवारी सावली पोलीस स्टेशनमध्ये दिली. पोलिसांनी तपास चक्रे फिरूवून मंगळवारी चार जणांना, तर शुक्रवारी सहा जणांना अटक केली.

A gang of 10 people stealing electricity wires is caught in the net | वीज तार चोरणारी १० जणांची टोळी जाळ्यात

वीज तार चोरणारी १० जणांची टोळी जाळ्यात

Next
ठळक मुद्देसर्वांना अटक : चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरील नव्या खांबावरून चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : नव्या विद्युत खांबावर लावलेले चार किलोमीटर अंतरावरील वीज तार चोरणारी दहा जणांची टोळी बुधवारी सावली पोलिसांच्या जाळ्यात अडकली.
नागेश राजू गांगरेड्डीवार (३०) रयतवारी कॉलरी चंद्रपूर, अब्दुल कामीर शेख (४४) रा. अष्टभुजा चंद्रपूर, प्रमोद देवराव सोयाम (३३), रवींद्र संपत गेडाम (२१), पवन गजानन घोडाम (२५), रणदीप शिवराम आत्राम (३७), प्रदीप रामू पेंदाम (३०), अनिल दामोदर तोडासे, योगिदास नामदेव सोयाम (२०) सर्व रा. वलणी, आकाश गोकुलदास शेडमाके (२०) रा. नवरगाव असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपीकडून ८ लाख ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चंद्रपूर- गडचिरोली मार्गावर नवे पोल उभारून वीज तार जोडणी सुरु आहे. सुमारे ५ किमी अंतरावर जोडलेले वीज तार चोरट्यांनी पळवल्याची तक्रार अमोल नाडेमवार व लव गौरकार यांनी बुधवारी सावली पोलीस स्टेशनमध्ये दिली. पोलिसांनी तपास चक्रे फिरूवून मंगळवारी चार जणांना, तर शुक्रवारी सहा जणांना अटक केली. आरोपीकडून ३ मोटरसायकल ९० हजार , ५ मोबाईल ३० हजार ५००, एक मालवाहू चारचाकी टाटा एस किमंत दोन लाख रुपये, अँल्युमिनियम तार पाच लाख, गुन्हात वापरलेले कटर व झुला १० हजार असा एकूण ८ लाख ३० हजार ५०० रपयांचा माल ताब्यात घेण्यात आला आहे.सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे यांच्या नेतृत्वात सावली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड , सहाय्यक फौ. लक्ष्मण मडावी, पोलीस हवालदार धमेंद्र मून, पोहवा नारायण सिडाम, नापोशी दर्शन लाटकर, पो. शि. सुमित मेश्राम, दीपक डोंगरे, अविनाश बांबोडे आदींनी केली.
 

Web Title: A gang of 10 people stealing electricity wires is caught in the net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर