शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी कोलाम बांधवांचा गडचांदूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:00 IST

कंपनी आदिवासी बांधवांचे शोषण करीत असल्याचा आरोप करीत माणिकगड व्यवस्थापनावर अ‍ॅट्रासिटी दाखल करा, या मागणीसाठी आदिवासी कोलाम बांधवांनी गडचांदूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. याशिवाय गावकऱ्यांचे पिण्याच्या पाण्याचे स्रोत नष्ट करणे, आदिवासीची शेती नष्ट करणे किंवा बळकावणे अशा अनेक तक्रारी आदिवासींच्या कंपनीविरोधात आहेत.

ठळक मुद्देमाणिकगड व्यवस्थापनावर अट्रासिटी दाखल करा

लोकमत न्यूज नेटवर्कबाखर्डी : गडचांदूरस्थित माणिकगड सिमेंट कंपनीच्या तक्रारीवरून ४० ते ५० आदिवासी कोलाम समाजावर विविध कलमा अतंर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याने आदिवासी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार कंपनी जाणीवपूर्वक करीत आहे. चार ते पाच गावांना जाणारा रस्ता बंद करुन सरकारी रस्त्यावर कंपनी गेट तपासणी नाका बसवून अनेकवेळा गेटवर लोकाना थांबविले जात आहे. तिथून बैलबंडी, ट्रॅक्टर, मोटार सायकल जाण्यास मज्जाव केला जात आहे. कंपनी आदिवासी बांधवांचे शोषण करीत असल्याचा आरोप करीत माणिकगड व्यवस्थापनावर अ‍ॅट्रासिटी दाखल करा, या मागणीसाठी आदिवासी कोलाम बांधवांनी गडचांदूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. याशिवाय गावकऱ्यांचे पिण्याच्या पाण्याचे स्रोत नष्ट करणे, आदिवासीची शेती नष्ट करणे किंवा बळकावणे अशा अनेक तक्रारी आदिवासींच्या कंपनीविरोधात आहेत. आदिवासी बांधवांचे शोषण सुरू असताना साधी चौकशी न करता कोलाम आदिवासी बांधवांवर गुन्हे दाखल करून पोलीसही कंपनीची पाठराखण करीत असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला आहे. यावेळी आबीद अली, भाऊराव कन्नाके, मारोती येडमे, अरूण उद्दे, केशव कुडमेथे, मुता सिडाम, झाडु सिडाम, ताराबाई कुडमेथे, पुष्पा मंगाम, शंकर आत्राम आदी उपस्थित होते.

टॅग्स :Strikeसंप