शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य प्रशासन विभागावर रोष

By admin | Updated: June 22, 2017 00:40 IST

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मंगळवारी सभा पार पडली. या सभेत नवनियुक्त अनेक सदस्यांनी डायरीचा मुद्दा उपस्थित करून सामान्य प्रशासन विभागावर रोष व्यक्त केला.

जि.प.ची स्थायी सभा : डायरी डावलून केली दिनदर्शिका प्रकाशितलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मंगळवारी सभा पार पडली. या सभेत नवनियुक्त अनेक सदस्यांनी डायरीचा मुद्दा उपस्थित करून सामान्य प्रशासन विभागावर रोष व्यक्त केला. जिल्हा परिषदेचे अधिकारी, त्यांच्या अधिनस्त असलेले कर्मचारी, त्यांचे संपर्क क्रमांक असलेली डायरी दरवर्षी प्रकाशित केली जाते. यंदा मात्र डायरी डावलून दिनदिर्शिका प्रकाशित करण्यात आली. ही दिनदर्शिका विनापरवानगीने सामान्य प्रशासन विभागाने प्रकाशित केली, असा आरोप स्थायी समितीच्या काही सदस्यांनी केली. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सभेत लावून धरली. जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात दैनंदिन डायरी छपाईसाठी एक लाख रुपयांची तरतूद आहे. सर्व विभागप्रमुखांसह अन्य शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक व दूरध्वनी क्रमांक या डारीमध्ये असते. आवश्यक माहितीसाठी ही डायरी अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांना उपयुक्त ठरते. डायरी छपाईचे कामकाज सामान्य प्रशासन विभागातर्फे केले जाते. फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली. यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. ५६ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बहुतांश सदस्य नवीन आहेत. मात्र त्यांच्याकडे अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक नाहीत. त्यामुळे कामकाजात त्यांना अडचणी येत आहे. त्यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे डायरीची मागणी केली होती. मात्र, डायरीऐवजी दिनदर्शिका छपाई करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळेच हा मुद्दा स्थायी समितीच्या सभेत गाजला. तेव्हा अध्यक्षांनी दिनदर्शिकेपेक्षा डायरी महत्त्वाची असून डायरी तातडीने छपाई करण्याचे निर्देश दिले. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यात वैयक्तिक स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यात आले. परंतु अद्याप लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाही. हाही मुद्दा सभेत गाजला.