शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वन संशोधनात निधीची आडकाठी

By admin | Updated: December 20, 2014 22:35 IST

वनांची प्रत सुधारून त्याची उत्पादन क्षमता वाढविणे हा वन व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश आहे. मात्र वन व्यवस्थापनाच्या तरतुदी सागावरच केंद्रित झाल्या आहेत. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहे.

मिळणारा निधी अपुरा : साग वगळता इतर प्रजातीचे संशोधन थांबलेरवी जवळे - चंद्रपूरवनांची प्रत सुधारून त्याची उत्पादन क्षमता वाढविणे हा वन व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश आहे. मात्र वन व्यवस्थापनाच्या तरतुदी सागावरच केंद्रित झाल्या आहेत. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहे. सागासोबतच इतर इमारती वृक्ष प्रजाती व गौण वन उपज देणाऱ्या प्रजातींचा संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी चंद्रपूरपासून सहा किमी अंतरावरील लोहारा येथे वन संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले. देशातील हे अशाप्रकारचे पहिले केंद्र असले तरी यावर शासनाचीच वक्रदृष्टी आहे. वन संशोधनासाठी शासनाकडून मिळणारा निधी अतिशय तोकडा असल्याने या केंद्रात साग वगळता इतर प्रजातींचे संशोधन जवळजवळ थांबलेच आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्हे उच्च प्रतिच्या सागाकरिता संपूर्ण देशात प्रसिध्द आहेत. यासोबतच या जिल्ह्यांमध्ये विविध इमारती वृक्ष प्रजाती व गौण वन उपज देणाऱ्या प्रजातींचा समावेश आहे. याशिवाय विविध वन औषधीही या परिसरातील जंगलात आढळून येतात. या सर्व प्रजातींचा संशोधनात्मक अभ्यास करण्याच्या उद्देशाने चंद्रपुरात १९६९ मध्ये महाराष्ट्र वन संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे मुख्यालय चंद्रपुरातच आहे. या संस्थेचे मुख्य संशोधन केंद्र लोहारा येथे असून २६० हेक्टर क्षेत्र या कामांसाठी आरक्षित ठेवले आहे. आतापर्यंत देशातील विविध भागातून तब्बल २५९ सागांची रोपे या ठिकाणी आणून लावण्यात आली आहेत. या वृक्षांचे जतन केले जात असून मदर ट्री म्हणून याचा वापर केला जातो. विविध राज्यातील या सागांच्या झाडांपासून बीज काढले जाते. त्यावर या केंद्रातच असलेल्या संयंत्राद्वारे प्रक्रिया करून दुसऱ्या रोपांवर बड ग्राफ्टिंग केले जाते. यातून निर्माण होणाऱ्या नवीन सागांच्या झाडांची वाढ, त्याची गोलाई या बाबी तपासल्या जातात व उच्च प्रजातीचे सागवान वृक्ष तयार केले जातात. वास्तविक सागाचे ज्या पध्दतीने संशोधन केले जात आहे, तसेच संशोधन इतर वृक्षांच्या प्रजातींचेही व्हायला हवे. मात्र ते अद्याप या केंद्रात होत नसल्याची माहिती आहे. शासनाकडून जो निधी या संशोधन कार्यासाठी पाठविला जातो. त्यातील ९० टक्के निधी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनावरच खर्च होतो. त्यामुळे इतर बाबींसाठी या कार्यालयाकडे निधीच नसतो.