शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालकांनी विविध मागण्यांसाठी काढला मोर्चा

By admin | Updated: September 29, 2014 23:03 IST

केंद्र शासनाच्या पंचायतराज मंत्रालयाने ईपीआरआय हा प्रकल्प सर्व राज्यांमध्ये राबविला आहे. त्यानुसार सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये संगणकीकरण करणे अंतर्भूत आहे.

चंद्रपूर : केंद्र शासनाच्या पंचायतराज मंत्रालयाने ईपीआरआय हा प्रकल्प सर्व राज्यांमध्ये राबविला आहे. त्यानुसार सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये संगणकीकरण करणे अंतर्भूत आहे. यासाठी संगणक परिचालक म्हणून बेरोजगार प्रशिक्षित युवकांची पदभरती करण्यात आली. मात्र कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर दिले जात नसून थकीत ठेवण्यात आले आहे. वेतन वेळेवर द्यावे, अशी मागणी करीत संगणक चालकांनी सोमवारी मोर्चा काढत जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन दिले. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. एवढेच नाही तर, जिल्हा परिषदेचे दोन्ही गेट बंद करून मोर्चेकऱ्यांना अडविण्यात आले.ई-पीआरआय प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी महाआॅनलाईन कंपनीमार्फत हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या कंपनीकडून वेळेवर वेतन दिले जात नसून मुलाखतीच्या वेळी निश्चित केलेले ८ हजार ८२४ रुपये एवढे वेतन न देता केवळ ३ हजार ८०० ते ४ हजार रुपये प्रतिमहिना वेतन दिले जाते. परंतु यातही तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे संगणक चालक त्रस्त झाले आहे.महाआॅनलाईन कंपनीकडे विनंती अर्ज करण्यात आले. त्याचबरोबर मुख्य कार्यपालन अधिकारी यांनाही लेखी निवेदन देण्यात आले. मात्र काहीही उपयोग झाला नाही. दरम्यान संगणक चालकांनी श्रमिक एल्गार संघटनेच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरु केले. तरीही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने सोमवारी महाकाली मंदिर परिसरातून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर प्रथम जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेवर मोर्चा नेण्यात आला. श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांना निवेदन दिले. दरम्यान जिल्हा परिषद परिसरात आज मोठ्या प्र्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. मात्र अद्यापही तोडगा निघाला नसल्याने साखळी उपोषण सुरुच ठेवण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)