फसवणूक, नोकरीचे आमिष दाखवून ७२ हजारांना गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:35 IST2021-02-05T07:35:26+5:302021-02-05T07:35:26+5:30

कोरपना : अल्ट्राटेक सिमेंट कंपनी येथे पॉवर युनिटमध्ये बॉयलर अटेंडंट या जागेवर स्थायी नोकरी लावून देतो म्हणून आदिवासी युवक ...

Fraud, showing job lure ruined 72 thousand | फसवणूक, नोकरीचे आमिष दाखवून ७२ हजारांना गंडविले

फसवणूक, नोकरीचे आमिष दाखवून ७२ हजारांना गंडविले

कोरपना : अल्ट्राटेक सिमेंट कंपनी येथे पॉवर युनिटमध्ये बॉयलर अटेंडंट या जागेवर स्थायी नोकरी लावून देतो म्हणून आदिवासी युवक मोरेश्वर कोडापेला चंद्रप्रकाश बोरकर यांनी ७० हजार रुपयांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

यासंदर्भात पीडित युवकाने गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नांदा येथील मोरेश्वर कोडापे हा युवक आयटीआयचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सन २००८ - ०९ अल्ट्राटेक कंपनीचा पॉवर प्लांट प्रशिक्षार्थी म्हणून कामावर होता. नंतर त्याने काही दिवस ठेकेदारीत काम केले. यादरम्यान त्याची चंद्रप्रकाश बोरकर याच्याशी जवळीक झाली. चंद्रप्रकाश बोरकर एका राजकीय पक्षाचा नेता असून, अल्ट्राटेक कंपनीत पाॅवर प्लांटला स्टोअर किपर म्हणून नोकरीवर होता. अल्ट्राटेक कंपनीत पाॅवर प्लांटमध्ये बाॅयलर अटेंडंटच्या जागा भरणार असल्याचे सांगून तुला या जागेवर परमनंट नोकरी लावून देतो. त्यासाठी ७२ हजार रुपये घेतले असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

दोन वर्षे लोटूनही नोकरी लावून देत नसल्याने पैसे परत करण्याची विनवणी मोरेश्वर व त्याचे आई, वडील करीत होते. परंतु बोरकर टाळाटाळ करायचा. त्यामुळे मोरेश्वरने आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार पोलीस स्थानक, गडचांदूर व उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचांदूर यांच्याकडे केली.

कोट

यासंदर्भात गडचांदूर पोलीस स्थानकात तक्रार प्राप्त झाली असून, विषय चौकशीत ठेवला आहे. चौकशी करून कारवाई करण्यात येईल.

- गोपाल भारती

ठाणेदार, गडचांदूर

कोट

गडचांदूर पोलीस स्थानकामध्ये मला बोलावण्यात आले असून, यासंदर्भात सविस्तर माहिती मी पोलिसांना देणार

आहे.

- प्रकाश बोरकर, आवारपूर

Web Title: Fraud, showing job lure ruined 72 thousand