शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाचा प्रयोग वन्यप्राण्यांवर ‘लय भारी’

By admin | Updated: December 18, 2014 22:53 IST

वन्यप्राण्यांकडून धान व इतर पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या नुकसानीपासून बचाव करण्याकरिता उपाययोजनांचे प्रात्याक्षिक क्षेत्र सहाय्यक विदेश गलगट यांनी वनउपक्षेत्र केळझर अंतर्गत

पोंभुर्णा : वन्यप्राण्यांकडून धान व इतर पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या नुकसानीपासून बचाव करण्याकरिता उपाययोजनांचे प्रात्याक्षिक क्षेत्र सहाय्यक विदेश गलगट यांनी वनउपक्षेत्र केळझर अंतर्गत अधिनस्त असलेल्या गावांमध्ये करून दाखविले. त्यांचे अनुकरण परिसरातील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये केले. यामध्ये देवाडा खुर्द, दाबगाव, जामखुर्द येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला असुन वन्य प्राण्यांमुळे शेतातील पिकांच्या होणाऱ्या नुकसानीला संरक्षण मिळाले आहे.दरवर्षी रानटी डुक्कर व इतर वन्यप्राण्यांच्या हैदोसाने धान व इतर पिकांची नासधूस होवून अनेक शेतकऱ्यांचे नुकसान व्हायचे. त्यामुळे शासनाला सुद्धा लाखो रुपये नुकसान भरपाई द्यावी लागायची. या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केळझर उपक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक विदेश गलगट यांनी वन्य प्राण्यांना हाकलून लावण्यासाठी आणि शेतमालाचे बचाव करण्यासाठी विनाखर्चाचे व घरगुती वापरातील वस्तुंचे प्रात्यक्षिक करून दाखविले. गोणपाट, काठी व वाळलेली साबन, मिरची याचा वापर करून त्याचा टेंबा तयार केला. सायंकाळच्या वेळी टेंब्यावर रॉकेल ओतून आग लावावी व शेताच्या सभोवताल वास पसरेल याप्रमाणे टेंबा फिरवावा. त्यानंतर दुसऱ्या उपाययोजनेत गोणपाट तेल किंवा खराब आॅईलमध्ये बुडवून त्यावर तिखटाची भुकटी दोन काठ्यांच्या सहाय्याने शेताच्या जंगलाकडील भागाकडे टांगून ठेवावी. तर तिसऱ्या उपाय योजनेत ओल्या शेणामध्ये वाळलेली मिरची व रेतीचा वापर करून गोवऱ्या तयार कराव्या. त्या गोवऱ्या वाळल्यावर सायंकाळच्या वेळेस शेताच्या धुऱ्यावर पेटवून धूर करावे. असे उपाय सतत आठ ते दहा दिवस केल्यास रानटी डुक्कर व इतर वन्यप्राणी शेतपिकांची हानी करणार नाही, असे त्यांनी सांगितले. प्रात्याक्षिक मार्गदर्शन घेतलेल्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष आपल्या शेतामध्ये प्रयोग करून पाहिले. त्यात त्यांना चांगलाच फायदा झाला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)