पाच लाखांचा दारूसाठा जप्त, सात आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:37 IST2021-06-16T04:37:51+5:302021-06-16T04:37:51+5:30

पहिल्या कारवाईत मेहबूब शेख (२६), अमीन इब्राहीम शेख (२८), गौरव चंद्रशेखर घसाळ, जसीम रहीम कुरेशी रा. वर्धा हे ...

Five lakh liquor seized, seven accused arrested | पाच लाखांचा दारूसाठा जप्त, सात आरोपी अटकेत

पाच लाखांचा दारूसाठा जप्त, सात आरोपी अटकेत

पहिल्या कारवाईत मेहबूब शेख (२६), अमीन इब्राहीम शेख (२८), गौरव चंद्रशेखर घसाळ, जसीम रहीम कुरेशी रा. वर्धा हे नागपूरमार्गे क्रमांक एमएच ४९- ३८२८ या वाहनाने दारू साठा घेऊन येत असताना पोलिसांनी टप्पा परिसरात नाकेबंदी केली. मात्र नाकेबंदी तोडून भरधाव वेगाने वाहन चंद्रपूरकडे नेत असताना पोलिसांनी पाठलाग करून त्या वाहनासह दारूसाठा व त्यातील चार आरोपींना ताब्यात घेतले.

दुसऱ्या कारवाईत ढोरवासा चौकीवर अमर लेडांगे, विष्णू मिटपल्लीवार, गणेश गलांडे रा. गवराळा हे देशी दारू आणत असताना भद्रावती पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई ठाणेदार सुनीलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेशन विभाग प्रमुख अमोल तुळजेवार, केशव चिटगिरे, एकनाथ राठोड, हेमराज प्रधान, शशांक बदामवार, गणेश भोयर, प्रदीप मडावी, गोपीनाथ नरोले, विनोद जाधव यांनी केली.

===Photopath===

140621\127-img-20210613-wa0083.jpg

===Caption===

पाच लाखाचा देशी-विदेशी दारूसाठा जप्त सात आरोपी अटकेत

Web Title: Five lakh liquor seized, seven accused arrested