शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

आगीत एक ट्रॅक्टर तुरीसह २० ट्रॅक्टर तणीस जळाले

By admin | Updated: February 25, 2016 00:51 IST

मंगळवारच्या रात्री २ वाजता तणसाच्या ढिगाऱ्याला आग लागून २० ट्रॅक्टर तणस व एक ट्रॅक्टर तूर जळून खाक झाल्याची घटना पिंपळगाव (भो.) येथे घडली.

पिंपळगाव : मंगळवारच्या रात्री २ वाजता तणसाच्या ढिगाऱ्याला आग लागून २० ट्रॅक्टर तणस व एक ट्रॅक्टर तूर जळून खाक झाल्याची घटना पिंपळगाव (भो.) येथे घडली. यात शेतकऱ्यांचे अंदाजे ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पीडित शेतकऱ्याला शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.पिंपळगाव (भो.) येथील लक्ष्मीनारायण मंदिर गुरुदेव वाडी येथील नरेश कुथे व देवराव कुथे यांच्या आवारात तणसाचे ढिग व तुरीच्या शेंगाचे ढिग रचून ठेवले होते. मंगळवारच्या रात्री अचानकपणे ढिगांना आग लागली. घटनास्थळ दाट लोकवस्तीत असल्याने आग सर्वत्र पसरण्याची भीती निर्माण झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पाटील प्रभाकर बांगरे यांनी सरपंच भारती लांजेवार, उपसरपंच हेमराज कामडी व माजी जि.प. सदस्य उमाजी कुथे यांना घटनेची माहिती दिली. ब्रह्मपुरी व वडसा येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. रात्री २ वाजता लागलेली आग बुधवारला सकाळी ८ वाजता आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.पावसाअभावी धानाचे खरीप पिक हाताचे गेले व रबी पिकाच्या आशेवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्याचे ७० हजार रुपयाचे रबी पिकही जळून खाक झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यांच्यापुढे जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने पीडित शेतकऱ्याला ताबडतोब आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)