सहा घटकातील मजुरांना आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:01 IST2020-05-14T05:00:00+5:302020-05-14T05:01:39+5:30

मध्यचांदा वनविभागात बल्लारशा, राजुरा, विरूर, कोठारी, धाबा, पोंभुर्णा, वनसडी व जिवती वनपरिक्षेत्र आहे. या वनपरिक्षेत्रात एकूण २२ तेंदू घटक आहे. त्यापैकी यावर्षी कंत्राटदारानी १७ तेंदू धटक खरेदी केले आहे. यामुळे येथील मजुरांना तेंदूपाने गोळा करण्याचे कामे मिळणार असून त्यापोटी मिळणाºया मजुरीमुळे आर्थिक सहाय्य होणार आहे.

Financial blow to six-factor workers | सहा घटकातील मजुरांना आर्थिक फटका

सहा घटकातील मजुरांना आर्थिक फटका

ठळक मुद्दे२२ पैकी १७ घटकांचीच विक्री : वर्षभराची पुंजी जाण्याची चिंता

लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : मध्यचांदा वनविभाग चंद्रपूरमधील २२ तेंदू घटकांपैकी यंदा १७ घटकांची विक्री झाली आहे. उर्वरित सहा तेंदूघटक विक्री न झाल्यामुळे त्या परिसरातील गोरगरीब आदिवासी व इतर मजुरांना तेंदूपाने गोळा करण्याच्या कामाअभावी मिळणाऱ्या मजुरीअभावी मुकावे लागणार आहे.
मध्यचांदा वनविभागात बल्लारशा, राजुरा, विरूर, कोठारी, धाबा, पोंभुर्णा, वनसडी व जिवती वनपरिक्षेत्र आहे. या वनपरिक्षेत्रात एकूण २२ तेंदू घटक आहे. त्यापैकी यावर्षी कंत्राटदारानी १७ तेंदू धटक खरेदी केले आहे. यामुळे येथील मजुरांना तेंदूपाने गोळा करण्याचे कामे मिळणार असून त्यापोटी मिळणाºया मजुरीमुळे आर्थिक सहाय्य होणार आहे. तेंदूपाने गोळा करण्याचे कार्य फक्त १५ दिवसाचे असून या कालावधीत प्रत्येक कुटुंबातील सदस्य तेंदूपाने गोळा करण्याचे कार्य करतात.
तेंदूपत्ता घटक विक्री न झालेले बेंबाळ, बल्लारशा, पळसगाव, विरूर, वनसडी व जिवती या तेंदू घटकातील मजुरांना मजुरीपासून वंचित होणार आहे. मजुरीपोटी कंत्राटदाराकडून नगदी रक्कम मिळत असून प्रत्येक कुटुंबास मजुरीपोटी हजारो रूपये मिळतात. हीच त्याची वर्षभराची पुंजी असते. त्यामुळे या कामासाठी आम जनता आतूरतेने वाट पाहत राहतात.
सहा तेंदू घटक विक्री न झाल्यामुळे तेथील इच्छूक मजुरांना आर्थिक फटका बसणार आहे. अगोदरच कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे कामाअभाावी आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यात पुन्हा तेंदू घटक विक्री न झाल्यामुळे त्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. त्याचा परिणाम आर्थिक स्थिती पुन्हा खालावण्याची पाळी आली आहे. या वन विभागाातील तेंदूपाने घटकाच्या विक्रीमुळे शासनास व मजुरांना कोट्यवधी रूपये मिळतात. वन विभागास मिळणाºया रकमेतून खर्च काढून जवळपास ७० टक्के रक्कम पाने गोळा करणााºया मजुरांना बोनस पोटी मिळतात. त्यामुळे विक्री न झालेल्या घटकातील हजारो मजुरांना तेंदूपाने गोळा करण्याची रक्कम व बोनस रकमेपासून वंचित होणार आहे.

Web Title: Financial blow to six-factor workers