शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक मागण्यांचा लढा तीव्र करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 06:00 IST

या अधिवेशनात विना-अनुदानित तुकड्यांना प्रचलित २० टक्के अनुदान द्यावे, सरसकट जुनी पेंशन योजना सर्वांना मिळावी, वाढीव उच्च माध्यमिक पदांना पुर्णवेळ मंजुरी मिळावी, वर्गातील पटसंख्या कमी करावी, उच्च माध्यमिक शिक्षकांना पी.एच.डी. व तत्सम गुणवत्ता वाढीनुसार पगारवाढ द्यावी आदी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देठराव मंजूर : उच्च माध्यमिक शिक्षकांचे तालुका अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : येथील विजुक्टा शाखा तालुका कार्यकारीणीद्वारे स्थानिक रमाबाई कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तालुका अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजुक्टातर्फे शिक्षकांच्या मागण्यांना प्राथमिकता देवून लढा तीव्र करु असा ठराव पारित करण्यात आला.या अधिवेशनाला जिल्हाध्यक्ष प्रा. राजेंद्र खाडे, कार्याध्यक्ष प्रा. अशोक पोफळे, उपाध्यक्ष प्रा. विजय गायकवाड, संघठन सचिव प्रा. कवडू पाटील, प्रसिध्दी प्रमुख प्रा. रविकांत वरारकर, कार्यकारी सदस्य प्रा. पुंजाराम लोंढ़े, तालुका अध्यक्ष प्रा.एन.एस. शेंडे, तालुका सचिव प्रा. पी.एन. कन्नाके व तालुका कार्यकारीणी तथा सावली तालुक्यातील उच्च माध्यमिक शिक्षक उपस्थित होते.या अधिवेशनात विना-अनुदानित तुकड्यांना प्रचलित २० टक्के अनुदान द्यावे, सरसकट जुनी पेंशन योजना सर्वांना मिळावी, वाढीव उच्च माध्यमिक पदांना पुर्णवेळ मंजुरी मिळावी, वर्गातील पटसंख्या कमी करावी, उच्च माध्यमिक शिक्षकांना पी.एच.डी. व तत्सम गुणवत्ता वाढीनुसार पगारवाढ द्यावी आदी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी सुरवातीला आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. जिल्हा कार्यकारिणीचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.तालुका सचिव प्रा. पी. एन. कन्नाके यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा कार्यकारीणीच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. राजेंद्र खाडे यांनी अध्यक्षीय भाषणाने समारोप झाला. संचालन प्रा. बोरकर, आभार प्रा. विजय गायकवाड यांनी मानले.

टॅग्स :Teacherशिक्षक