शिक्षक मागण्यांचा लढा तीव्र करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 06:00 AM2020-01-22T06:00:00+5:302020-01-22T06:00:25+5:30

या अधिवेशनात विना-अनुदानित तुकड्यांना प्रचलित २० टक्के अनुदान द्यावे, सरसकट जुनी पेंशन योजना सर्वांना मिळावी, वाढीव उच्च माध्यमिक पदांना पुर्णवेळ मंजुरी मिळावी, वर्गातील पटसंख्या कमी करावी, उच्च माध्यमिक शिक्षकांना पी.एच.डी. व तत्सम गुणवत्ता वाढीनुसार पगारवाढ द्यावी आदी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.

The fight for teacher demands will intensify | शिक्षक मागण्यांचा लढा तीव्र करणार

शिक्षक मागण्यांचा लढा तीव्र करणार

Next
ठळक मुद्देठराव मंजूर : उच्च माध्यमिक शिक्षकांचे तालुका अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : येथील विजुक्टा शाखा तालुका कार्यकारीणीद्वारे स्थानिक रमाबाई कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तालुका अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजुक्टातर्फे शिक्षकांच्या मागण्यांना प्राथमिकता देवून लढा तीव्र करु असा ठराव पारित करण्यात आला.
या अधिवेशनाला जिल्हाध्यक्ष प्रा. राजेंद्र खाडे, कार्याध्यक्ष प्रा. अशोक पोफळे, उपाध्यक्ष प्रा. विजय गायकवाड, संघठन सचिव प्रा. कवडू पाटील, प्रसिध्दी प्रमुख प्रा. रविकांत वरारकर, कार्यकारी सदस्य प्रा. पुंजाराम लोंढ़े, तालुका अध्यक्ष प्रा.एन.एस. शेंडे, तालुका सचिव प्रा. पी.एन. कन्नाके व तालुका कार्यकारीणी तथा सावली तालुक्यातील उच्च माध्यमिक शिक्षक उपस्थित होते.
या अधिवेशनात विना-अनुदानित तुकड्यांना प्रचलित २० टक्के अनुदान द्यावे, सरसकट जुनी पेंशन योजना सर्वांना मिळावी, वाढीव उच्च माध्यमिक पदांना पुर्णवेळ मंजुरी मिळावी, वर्गातील पटसंख्या कमी करावी, उच्च माध्यमिक शिक्षकांना पी.एच.डी. व तत्सम गुणवत्ता वाढीनुसार पगारवाढ द्यावी आदी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी सुरवातीला आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. जिल्हा कार्यकारिणीचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
तालुका सचिव प्रा. पी. एन. कन्नाके यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा कार्यकारीणीच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. राजेंद्र खाडे यांनी अध्यक्षीय भाषणाने समारोप झाला. संचालन प्रा. बोरकर, आभार प्रा. विजय गायकवाड यांनी मानले.

Web Title: The fight for teacher demands will intensify

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक