शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

बनावट सातबाऱ्यावर चार लाख रुपये कर्जाची उचल

By admin | Updated: July 8, 2014 23:21 IST

बनावट सातबारा आठ अ व नकाशा तयार करुन मागील दोन वर्षात दोनदा चार लाख रुपयांच्या कर्जाची बँकेतून उचल केल्याचे लक्षात आल्याने बँकेच्यावतीने पोलिसात तक्रार देण्यात आली.

दोन दिवसांची पोलीस कोठडी : तलाठ्यासह एक अटकेतवरोरा : बनावट सातबारा आठ अ व नकाशा तयार करुन मागील दोन वर्षात दोनदा चार लाख रुपयांच्या कर्जाची बँकेतून उचल केल्याचे लक्षात आल्याने बँकेच्यावतीने पोलिसात तक्रार देण्यात आली. या तक्रारीवरुन बनावट सातबारा देणारा तलाठी व शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली असून आज न्यायालयात हजर केले असता त्या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. थोराना येथील नानाजी सिताराम भट (४५) यांच्या सर्व्हे क्र. १७६ मधील ३.२० आर जमिनीच्या सातबारावर एकून नऊ वारसदार होते. या वारसादारांची संमती घेतली नाही व त्यांची नावे सातबारावरुन कमी केली. त्याला फटाळा येथील तलाठी अक्षय रामगिरवार याने बनावट सातबारा, आठ व अ व नकाशा दिला. नानाजी भट याने बनावट दस्तावेज बँक आॅफ महाराष्ट्र कुचना येथे सादर करुन सन २०१३ मध्ये एक लाख रुपयांचे पीक कर्ज उचलले. सन २०१४ मध्ये अशाच प्रकारची बनावट कागदपत्रे तयार करुन बँक आॅफ महाराष्ट्र कुचना येथून शेतात बोअरवेलच्या खोदकामाकरिता तीन लाख रुपये कर्जाची उचल केली. बोअरवेल ज्या शेतात खोदण्याची, त्या शेतात खोदली नाही व दुसऱ्या शेतात खोदल्याने बँकेच्या अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी याबाबत चौकशी सुरु केली असता कर्ज प्रकरणात लावण्यात आलेले सातबारा, आठ अ व नकाशा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर माजरी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांविरुद्ध कलम ४२०, ४६८ भादंविने गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. आज दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन तामठे करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)