संपामुळे लोकवाहिनी थांबली

By Admin | Updated: December 18, 2015 01:15 IST2015-12-18T01:15:45+5:302015-12-18T01:15:45+5:30

पगारवाढीच्या संदर्भात कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात न आल्याने गुरूवारपासून एसटी कामगारांनी संपाचे हत्यार उपसले.

Festers stopped due to the strike | संपामुळे लोकवाहिनी थांबली

संपामुळे लोकवाहिनी थांबली

एसटीविना प्रवाशांचे हाल : विद्यार्थी आणि ज्येष्ठांना सहन करावा लागला मन:स्ताप
चंद्रपूर: पगारवाढीच्या संदर्भात कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात न आल्याने गुरूवारपासून एसटी कामगारांनी संपाचे हत्यार उपसले. परिणामी लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीची चाके थांबली.संपामुळे गुरूवारी प्रवाशांचे चांगलेच हाल झालेत.
२५ टक्के पगारवाढीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, या मागणीसाठी गुरूवारी महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) च्यावतीने गुरूवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. यात जिल्ह्यातील विविध आगारात कार्यरत चालक वाहकासह तांत्रिक विभागातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. वरोरा व राजुरा वगळता अन्य आगारातून सकाळपासून एकही बस न निघाल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. नागरिकांसह शाळकरी मुलांना या संपाचा चांगलाच फटक बसला. काही पालकांनी स्वतंत्र व्यवस्था करून मुलांना शाळेत पोहचवले, तर अनेक विद्यार्थी शाळेतच पोहचले नाहीत. ज्येष्ठ नागरिकांनाही संपामुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. पगारवाढीसंदर्भात १७ डिसेंबरपर्यंत निर्णय न घेतल्यास संप पुकारण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार गुरूवारपासून कामगारांनी संपाचे हत्यार उपसले. (प्रतिनिधी)

Web Title: Festers stopped due to the strike