शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वेतनासाठी एफडीसीएम कर्मचारी करणार अन्नत्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:29 IST

चंद्रपूर : राज्यातील इतर महामंडळ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. असे असले ...

चंद्रपूर : राज्यातील इतर महामंडळ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. असे असले तरी आर्थिक फायद्यात असतानाही वनविकास महामंडळातील अधिकारी, कर्मचारी या वेतनापासून वंचित आहेत. त्यामुळे आता कर्मचारी टोकाची भूमिका घेणार असून त्याची सुरुवात १ मार्चपासून अन्नत्याग आंदोलनाने करणार आहेत. यासंदर्भात वनविभागाच्या प्रधान सचिवांना निवेदनही देण्यात आले आहे.

महाराष्ट्र वनविकास महामंडळात राज्यभरात दोन हजारावर अधिकारी, कर्मचारी आहेत. या माध्यमातून वनाचे जतन तसेच विविध वृक्ष लावून त्या माध्यमातून जमिनीचा विकास, वृक्षांची देखभाल, संरक्षण आणि विक्री करून नफा मिळविण्यासोबतच पर्यावरण संतुलनासाठी प्रयत्न आणि वन्यजीवाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. यासाठी कर्मचारी, अधिकाऱ्यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन मिळत असतानाही राज्यभरातील दोन हजारावर कर्मचाऱ्यांना महामंडळाने अद्यापही सातवा वेतन आयोग सुरू केला नाही. विशेष म्हणजे, महामंडळ आर्थिक फायद्यात आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागाही भरत नसल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडला आहे. इतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग सुरू करण्यात आला आहे. मात्र वनविकास महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवरच अन्याय का, असा प्रश्न महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी, कर्मचारी संघटनेने उपस्थित केला असून, आता संघटना १ मार्चपासून व्यवस्थापकीय संचालक, प्रादेशिक संचालक, विभागीय व्यवस्थापक यांच्या कार्यालयासमोर धरणे तसेच अन्नत्याग आंदोलन करणार आहे.

कोट

राज्य सरकारमधील इतर कर्मचाऱ्यांना तसेच वनविभागातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. मात्र एफडीसीएममधील कर्मचाऱ्यांना अद्यापही सातवा वेतन लागू करण्यात आला नाही. आजपर्यंत विभागाला निवेदन देऊन मागणी करण्यात आली. मात्र दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता १ मार्चपासून आंदोलनाचे हत्यार उपसले जाणार आहे.

-बी.बी. पाटील

कार्याध्यक्ष

महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी, कर्मचारी संघटना