शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या अधिनियमाने लोकवाहिनी धोक्यात

By admin | Updated: December 16, 2014 22:48 IST

सर्वसामान्यांची लोकवाहिणी असलेले एसटी महामंडळ ग्रामीण भागातील प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी पोहचविण्याचे एक साधन आहे. एसटीने अनेक खाचखळग्यांचा प्रवास करीत आजपर्यंत सर्वसामान्य ग्रामीणांना

एस.टी. कर्मचाऱ्यांत खळबळ चंद्रपूर : सर्वसामान्यांची लोकवाहिणी असलेले एसटी महामंडळ ग्रामीण भागातील प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी पोहचविण्याचे एक साधन आहे. एसटीने अनेक खाचखळग्यांचा प्रवास करीत आजपर्यंत सर्वसामान्य ग्रामीणांना सेवा देत आहे. मात्र केंद्र शासनाच्या प्रस्तावित रोड ट्रान्सपोर्ट आणि सेप्टी बील २०१४ च्या नव्या कायद्याने लोकवाहिनी धोक्यात आल्याची भावना एसटी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.मागील अनेक वर्षापासून सर्वसामान्य जनतेची वाहतूक करुन सेवा देत असलेली लोकवाहिनी ‘गाव तिथे एसटी’ प्रमाणे प्रवाशी संख्या नसली तरी सेवा म्हणून त्या गावात जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एसटीला लोकवाहिनी म्हणून ओळखले जाते. एसटीद्वारे सर्वसामान्य नागरिकांना अनेक सवलती देवून प्रवास करण्याची मुभा देण्यात येते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक पास, मुलींकरिता अहिल्याबाई होळकर मोफत पास तर अकरावी बारावीच्या विद्यार्थिनींंना मानव विकास अंतर्गत मोफत प्रवास योजना, अंध-अपंगाकरिता सवलतीच्या दरात प्रवास तथा ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता अर्ध्या तिकीट दरात प्रवास अशा अनेक योजना एसटीच्यावतीने जनतेला पुरविल्या जात आहेत. प्रवाशी नसले तरी, तोटा सहन करुन त्या गावात एसटी जात आहे. या फेऱ्या डोंगराळ व अतीदुर्गम भागातील जनतेकरिता चालविल्या जात आहे. प्रतिदिन बंधनकारक प्रवासामुळे एसटीला तोटा सहन करावा लागत आहे. तरीही लोकवाहिनी ग्रामीण नागरिकांना सेवा सुरूच आहे. मात्र केंद्र शासनाच्या प्रस्तावित कायद्याची अंमलबजावणी झाल्यास एसटीच्या मार्गावर खाजगी वाहतुकदारांकडून सेवा दिली जाणार आहे. त्यामुळे अनेक गावातील ग्रामीण जनता तसेच अनेक विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक, अंध- अपंग यांना एसटीच्या सेवेपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे प्रस्तावित कायद्याच्या अंमलबजावणी विरोधात सर्व आगार व युनिट १८ डिसेंबरला आंदोलन करणार आहेत. केंद्र शासनाच्या प्रस्तावित बिलामुळे एसटीवर विपरीत परिणाम होणार आहे. खाजगी वाहतूकदारांना परवानगी दिल्यास एसटी तोट्यात जावून सव्वा लाख कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार असल्याने केंद्राच्या बिलामुळे खळबळ उडाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)