शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने शेतकरी वैतागले

By admin | Updated: October 18, 2015 01:01 IST

वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या कमी वीज दाबाच्या पुरवठ्याने शेतातील मोटारपंप सुरू होत नाहीत.

शेतातील मोटारपंप झाले निकामी : रबी हंगामही धोक्यात येण्याची शक्यतागोवरी : वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या कमी वीज दाबाच्या पुरवठ्याने शेतातील मोटारपंप सुरू होत नाहीत. अनेकदा वीज पुरवठा खंडीत होत असल्याने मोटारपंप सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात चकरा माराव्या लागत आहे. खंडीत वीज पुरवठा व सातत्याने होणाऱ्या विजेच्या लपंडावाने शेतकऱ्यांचा रब्बी हंगामही धोक्यात आला आहे.राजुरा तालुक्यातील राजुरा वीज वितरण विभागांतर्गत गोवरी परिसरातील अनेक गावांतील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. सध्या रब्बी हंगामाला शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. दुरूस्तीच्या नावाखाली वीज वितरण कंपनी जनतेवर भारनियमनाचा बडगा उगारत आहे. या अघोषित भारनियमनाने नागरिक चांगलेच वैतागले आहेत. गोवरी, पोवनी, चिंचोली, माथरा, अंतरगाव, गोयेगाव, साखरी, वरोडा परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. सध्या शेतातील पिकांना मोटारपंपाच्या साहाय्याने पाणी द्यायला शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. मात्र वीज वितरण कंपनीच्या कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने घरगुती बल्बही सुरू होत नाहीत. एवढ्या कमी प्रमाणात वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे घरातील विजेची उपकरण शोभेची वस्तू झाली आहे. वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने लाख रुपये खर्च करून शेतात लावलेले मोटारपंप जळण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. विजेचा कमी प्रमाणात वापर होत असतानाही वीज वितरण कंपनीकडून क्षमतेपेक्षा जास्त वीज बिल पाठविले जाते. एकीकडे वीज नसल्याने नागरिक त्रस्त आहे तर दुसरीकडे जादा वीज बिलाचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे.शेतपिकांना सध्या सिंचनाची आवश्यकता आहे. दिवस-रात्रं कष्ट करून फुलविलेली पिके पाण्याअभावी सुकायला लागली आहेत. शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी शेतात जातात. मात्र कमी वीज दाबाच्या पुरवठ्याने शेतातील मोटारपंप सुरू होत नाही. वीज पुरवठा कधीही बंद करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना शेतात हेलपाटे मारावे लागत आहेत. शेतकरी वीज येण्याची आतूरतेने वाट पाहतात. मात्र वीज येत नाही. त्यामुळे शेतकरी चांगलेच वैतागले आहेत. याकडे वीज वितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)वीज वितरण कंपनीकडून कमी वीज दाबाचा पुरवठा करण्यात येत असल्याने शेतातील मोटारपंप सुरू होत नाही. परिणामी शेतातील पीक पाण्याअभावी सुकायला लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा रबी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता आहे.- भास्कर जुनघरी, शेतकरी, गोवरीविरूर (स्टेशन) येथील वीज उपकेंद्रातून ३३ के.व्ही. चा वीज पुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र त्यापेक्षा कमी वीज पुरवठा होत असल्याने कमी वीज दाबाची समस्या निर्माण झाली आहे.- श्रीनिवास बडगू, सहायक अभियंता (ग्रामीण), राजुरा