शेतकऱ्यांचा तालुका कृषी कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 06:00 AM2019-11-23T06:00:00+5:302019-11-23T06:00:43+5:30

यंदा जिल्ह्याला हरभरा पिकाच्या प्रमाणित बियाणासाठी २ हजार ६२२ क्विंटल उद्दिष्टे ठेवण्यात आले. मात्र शेतकऱ्यांना हरभरा उपलब्ध होत नसल्याने तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्रमाणित हरभरा बियाणे तातडीने देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. दहा-बारा दिवसाचा कालावधी लोटल्यास उत्पन्नावर अनिष्ट परिणाम होण्याचा धोका आहे.

The farmers' talukas are located in the agricultural offices | शेतकऱ्यांचा तालुका कृषी कार्यालयात ठिय्या

शेतकऱ्यांचा तालुका कृषी कार्यालयात ठिय्या

Next
ठळक मुद्देरब्बी हंगाम खोळंबणार : शेतकऱ्यांना हरभरा बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात प्रमाणित बियाने हरभरा बियाणे उपलब्ध न झाल्याने शेतकºयांनी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके यांच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी बारा वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. हरभरा बियाणे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने कृषी विभागाची तारांबळ उडाली होती.
चिमूर तालुक्यात नेरी, मासळ खडसंगी, भिसी, शंकरपूर परिसर खरीप हंगामातील धान, कापूस, सोयाबीन आणि रब्बी पिकासांठी हरभरा,गहू पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. शेतकऱ्यांचा खरिप हंगाम संपण्याच्या मार्गावर आला आहे त्यामुळे शेतकरी रब्बी पिकाच्या पेरणीसाठी तयारीला लागला आहे यावर्षी जिल्ह्यासह चिमूर तालुक्यात पडलेल्या पावसामुळे ओला दुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले. शेतकरी अनुदान तत्वावर हरभरा बियाणे मिळण्याकरिता कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. मात्र हंगाम सुरू होऊनही बियाणे न मिळाल्याने शेतकरी त्रस्त झाले. जि. प. सदस्य बुटके यांच्या नेतृत्वामध्ये कृषी अधिकारी ठिय्या आंदोलन केले. यावेळी सुनील दाभेकर, प्रमोद दांडेकर, विवेक रामटेके, वडशी, विनोद मेश्राम, प्रकाश कुमरे, दिगंबर कामडी, बालाजी कामडी, सुनील कडवे, रत्ना सोनुने, बालाजी वाकडे, बकाराम वाकडे, यशवंत सावसाकडे, विकास वाकडे, मधुकर भोयर, देवनाथ रादये मदनापूर , पांडुरंग वाकडे उपस्थित होते.

रब्बी हंगाम वाया जाण्याच्या मार्गावर
यंदा जिल्ह्याला हरभरा पिकाच्या प्रमाणित बियाणासाठी २ हजार ६२२ क्विंटल उद्दिष्टे ठेवण्यात आले. मात्र शेतकऱ्यांना हरभरा उपलब्ध होत नसल्याने तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्रमाणित हरभरा बियाणे तातडीने देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. दहा-बारा दिवसाचा कालावधी लोटल्यास उत्पन्नावर अनिष्ट परिणाम होण्याचा धोका आहे. पहिल्या टप्प्यात काही शेतकऱ्यांना हरभरा बियाणे दिल्याचे समजते. पण, शेकडो शेतकरी वंचित राहिले. दुसऱ्या टप्प्यात बियाणे येणार की नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. हरभरा बियाणाची वाट बघत आहेत तर काही शेतकऱ्यांना परमिट वाटप करण्यात आले. पेरणीची वेळ निघून गेल्यानंतर काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.

Web Title: The farmers' talukas are located in the agricultural offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.