शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

धान्य पिकवूनही शेतकऱ्यांचे हात रिकामे

By admin | Updated: December 30, 2016 01:35 IST

सर्वसामान्य जनता, शेतकरीवर्गाला नोटाबंदीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पीक हातात आल्यावर हा शेतकरीवर्ग विकून हातात आलेल्या

पैशाची चणचण : व्यापाऱ्यांकडून मिळतात धनादेश, बँकेचे व्यवहार करणे अडचणीचे चंद्रपूर : सर्वसामान्य जनता, शेतकरीवर्गाला नोटाबंदीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पीक हातात आल्यावर हा शेतकरीवर्ग विकून हातात आलेल्या पैशाने देणं- घेणं करुन आपली उपजिविका करतो. मात्र, पीक विकूनही हातात पैसा मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचे चित्र नागभीड तालुक्यात दिसून येत आहे. डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यांत शेतकऱ्यांचे धान्य निघत असल्याने बहुतेक शेतकरी धान्यविक्रीसाठी बाजार समितीमध्ये नेत असतात. धान्य विकून देण्याघेण्याचे व्यवहार करीत असतात. परंतु नोटाबंदीमुळे पैशाची चणचण भासत आहे. व्यापारीवर्गाकडून शेतकऱ्यांना चेकद्वारे व्यवहार करण्यात येत आहे. त्यामुळे अशिक्षित शेतकऱ्यांना त्रास होत आहे. धान्य विकूनही खर्चासाठी पैसा नाही म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांचे स्वत:चे बँकेत खाते नाही. मात्र, शेतकऱ्यांना चेक मिळत नसल्याने बँकेचे खाते काढण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकरीवर्ग कमालीचा वैतागलेला आहे. ऐन देवाण-घेवाणीच्या हंगामात नोटांचा तुटवडा भासत असल्याने कामे ठप्प पडली आहेत. मुलामुलींचे विवाह जुळविण्याचे कार्यसुद्धा याच महन्यिात पार पडतात. मात्र, नोटाबंदीचा फटका लग्नकार्यालाही बसला आहे. लहान मोठे कार्य करु म्हटले तर जवळ पैसा नाही. बँका वेळेवर पैसे देत नाही. कमी पैशात काहीच कामे होत नाही. अशा अनेक समस्या नागरिकांसमोर उभ्या आहेत. ग्रामीण भागातसुद्धा नोटाबंदीचा प्रभाव पडला आहे. लहान दुकानदारापासून ते मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत सर्वानाच नोटाबंदीचा फटका बसला आहे. पैसे नसल्याने अनेकांचे व्यवहार ठप्प पडले आहेत. सध्या सगळीकडे खरेदी-विक्री सुरु असल्याने नगदी रोकड मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसह शेतकरी त्रस्त आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांना धनादेशावर व्यवहार करणे अडचणी जात आहे. शेतकऱ्यांना बँकेच्या व्यवहाराचे ज्ञान नसल्याने दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे.(वार्ताहर)