शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो, आरबीटी, चोरबीटी कापूस बियाणे खरेदी करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST

शेतीमध्ये सततचा तणनाशकाचा वापर होत असल्याने कालांतराने त्या शेतीमध्ये कोणतेही पीक उगवणार नाही अशी शक्यता आहे. चोर बीटीमध्ये गुलाबी बोंड अळीला प्रतिकार करणाºया जीनची उपलब्धता आवश्यक असलेल्या विहीत टक्केवारीपेक्षा कमी असल्यामुळे हे वाण गुलाबी बोंड अळीस हमखास बळी पडते व त्याचा दुष्परिणाम कापूस पिकावर होतो.

ठळक मुद्देकृषी विभागाचे आवाहन। कोरोनाच्या दहशतीतही जिल्ह्यात छुपी विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्लायफोसेट तणनाशकाचा अनावश्यक वापर वाढल्यामुळे जैवविविधतेस बाधा येत असुन जमीन व मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आरबीटी, चोरबीटी कापूस बियाणे खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.शेतीमध्ये सततचा तणनाशकाचा वापर होत असल्याने कालांतराने त्या शेतीमध्ये कोणतेही पीक उगवणार नाही अशी शक्यता आहे. चोर बीटीमध्ये गुलाबी बोंड अळीला प्रतिकार करणाऱ्या जीनची उपलब्धता आवश्यक असलेल्या विहीत टक्केवारीपेक्षा कमी असल्यामुळे हे वाण गुलाबी बोंड अळीस हमखास बळी पडते व त्याचा दुष्परिणाम कापूस पिकावर होतो. बियाण्याची विक्री, साठवणूक अथवा खरेदी करण्यात येऊ नये याकरिता कृषी विभाग व पोलीस विभागाच्या संयुक्तपणे शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे. शेतकऱ्यांनी बियाण्याची पेरणी त्यांच्या शेतावर केल्यास व पेरणी पश्चात कोणत्याही प्रकारची तक्रार केल्यास दखल घेण्यात येणार नाही, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. पाटील यांनी स्पष्ट दिले. कोविड-१९ या संसर्गजन्य आजारापासून संरक्षण करण्यासाठी शेतात काम करताना ३ ते ५ फूट अंतर ठेवावे. हात वारंवार साबणाने धुवावे, शक्यतो सॅनिटायझरही वापरावा, असे आवाहन कृषी विभागाने केले.चोर बीटीचे दुष्परिणामजिल्ह्यात चोर बीटी या नावाने परिचित व शासन मान्यता नसलेल्या अनधिकृत कापूस बियाण्याचा व्यवसाय काही खासगी व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती कृषी विभाग व प्रशासनाला प्राप्त होत आहे. हे बियाणे ग्लॉयफोसेट या तणनाशकाला प्रतिकारक्षम असल्यामुळे शेतकरी याकडे आकर्षित होतात. परंतु, त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम आढळून आल्यामुळे शासनाने या बियाण्यास मान्यता दिली नाही.अन्यथा पाच वर्षाची शिक्षाबियाणे उत्पादनास अधिकृत मान्यता नसल्याने सदरील बियाणे पुर्णपणे अनधिकृत रित्या उत्पादीत केले असुन सदर बियाणे बाळगणे, साठा करणे, विक्री करणे हे कापूस बियाणे अधिनियम २००९, बियाणे नियम १९६६ व पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या तरतुदीनुसार कायदेशीर कारवाईस पात्र आहे. यामध्ये पाच वर्षांची शिक्षा व एक लाख दंडाची तरतूद आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस