शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

टमाटरचे भाव ऐकून डोळे लाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:00 IST

किरकोळ बाजारात प्रतिकिलो ८० रुपये या भावाने टमाटरची विक्री होत आहे. आठवड्यातील पावसामुळे टमाटर खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी व मागणी जास्त आहे. ही बाब टमाटरचे भाव आणखी वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याचे विक्रेते सांगत आहे.

ठळक मुद्दे८० रुपये किलो : लॉकडाऊनमुळे बिघडले आर्थिक गणित

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : टमाटरचे भाव ऐकून डोळे लाल होण्याची वेळ आली आहे. काही दिवसांपासून टमाटरचे भाव वाढतीवर आहे. किरकोळ बाजारात प्रतिकिलो ८० रुपये या भावाने टमाटरची विक्री होत आहे. आठवड्यातील पावसामुळे टमाटर खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी व मागणी जास्त आहे. ही बाब टमाटरचे भाव आणखी वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याचे विक्रेते सांगत आहे.जिल्ह्यात उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकविला जातो. मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्यानंतर भाजीपाला शेतात खराब झाला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर मागणी वाढली. मागील १५ दिवसात फळ भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या संकटातून सावरत असलेल्या उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. प्रतवारीनुसार टमाटर कॅरेटला ८०० ते ९०० रुपयांच्या भाव मिळत आहे. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाटरची आवक घटल्याने बाजार भावात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात उत्तम प्रतीच्या टमाटरचे दर किलोमागे ८० रुपयांवर पोहचले. शुक्रवारपर्यंत घाऊक बाजारात ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने विकल्या जाणाऱ्या टमाटरचे दर रविवारी ८० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले होते. कोरोनामुळे शेतकऱ्यांनी पाल्याभाज्यांना भाव मिळत नसल्याने भाजीपाल्याकडे पाठ फिरवली. बाजारात टमाटरची आवक कमी झाल्याने टमाटर भाव खात असल्याचे एका विक्रेत्याने सांगितले.बाजारात टमाटरची आवक घटल्याने बाजार भावात मोठी वाढ झाली आहे. लिलावात चांगल्या प्रतीच्या टमाटर क्रेटचे भाव कडाडले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात टमाटरची विक्री ६० ते ८० रुपये किलोप्रमाणे भाव आहे.- जवाहर राजपूत, विक्रेता, चंद्रपूर 

टॅग्स :Marketबाजार