शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

खर्च मर्यादा ४० लाखांची; उमेदवारांचा प्रचारखर्च कळेना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 13:09 IST

विधानसभा निवडणूक : सगळीकडेच खर्च दिसतोय वारेमाप

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा जवळ आला आहे. असे असताना प्रचार खर्चाच्या पारदर्शकतेवर मात्र प्रश्न उपस्थित होत आहेत. ५ नोव्हेंबरपासून प्रचाराला सुरुवात झाली असून, सोमवारी सायंकाळी प्रचार थांबणार आहे. मात्र, आजपर्यंत उमेदवारांनी प्रचारावर किती खर्च केला, याचा ताळेबंद असला तरी वारेमाप खर्चावर खरंच नियंत्रण आहे का, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

निवडणूक आयोगाने प्रचार खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये निश्चित केली आहे. तरीही उमेदवार पाण्यासारखा पैसा खर्च करत असल्याचे सुज्ञ नागरिकांचे मत आहे. खर्चाचे दाखले आणि वास्तवातील फरक, प्रचारादरम्यान उमेदवार मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करत असल्याचे उघड दिसत आहे. मतदारसंघात उमेदवारांची शेकडो वाहने धावत असून त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होताना दिसत आहे. जिथे तिथे जेवणावळीवरही खर्च होत आहे. मात्र, अधिकृत कागदपत्रांमध्ये कमी खर्च दाखवला जातो का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. निवडणूक खर्च तपासणीसाठी शासनाने निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. या निरीक्षकांचा वॉच मतदारसंघावर आहे. तसेच उमेदवारांनी दिलेल्या खर्चाचे तपशीलही तपासले जात आहेत. असे असले तरी सामान्य माणसाला पडलेला प्रश्न बरेच काही सांगून जातो. त्यामुळे उमेदवारांनीच आपला खर्च करताना मर्यादा पाळणे गरजेचे आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Politicsराजकारणchandrapur-acचंद्रपूर